Loksabha Election : एकनाथ खडसे यांनी ते भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीमध्ये (शरद पवार गट) आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या स्नुष खासदार रक्षा खडसे यांनी रोहिणी यांना भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले होते. त्याला रक्षा खडसे यांनी उत्तर दिले आहे.
'मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP) पक्षाच्या विचारधारासोबत कायम राहणार आहे. रक्षाताई खडसे यांनी मला भाजपामध्ये आणण्यासाठी त्या प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी मी राष्ट्रवादीसोबत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबत कायम राहणार आहे.', असे म्हणत रोहिणी खडसे (Rohini khadse) यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रावेत लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांचे नाव शरद पवार यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, तब्बेतीचे कारण सांगत खडसे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचे घोषित केले होते. त्याच वेळी आपण भाजपमध्ये जाणार असलो तरी रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले होते.
रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात 2019 मध्ये भाजपमध्ये असताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होत. त्यांच्या पराभवासाठी भाजपमधूनच प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होता. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.