Rahuri Ashram School Incident Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Ashram School Incident : आश्रमशाळेतील 'त्या' प्रकारानं संतापाची लाट; एक नव्हे, तब्बल तीन-चार मुलींशी शिक्षकाचं गैरवर्तन

Teacher Ashram school Rahuri Ahilyanagar district arrested by police misconduct three-four minor girls : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमधील एका आश्रमशाळेतील शिक्षकाने लहान मुलींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपाताची लाट उसळली आहे.

Pradeep Pendhare

Minor Girls Misbehaved Rahuri : बदलापूर इथल्या एका प्रतिष्ठीत शाळेतील लहान मुलींबरोबर गैरवर्तनाच्या प्रकारानंतर संपूर्ण राज्य हादरलं होतं. अशा घटना घडू नये याची ग्वाही महायुती सरकारने दिली होती.

मात्र, बदलापूर इथल्या प्रकरणाची पुनरावृत्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेत झाली आहे. शिक्षकाने मुलींबरोबर केलेल्या या कृत्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

राहुरीतील एका आश्रम शाळेतील शिक्षक गणेश खांडवे आश्रम शाळेतील (School) मुलींबरोबर अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या शिक्षकाच्या वासनेच्या आश्रमामधील एक नव्हे, तर तीन-चार मुलींशी गैरवर्तन केल्याची माहिती समोर येत आहे. एका मुलीने आईकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीची आई आक्रमक झाल्यावर तो शिक्षक हा पसार झाला होता. राहुरी पोलिसांनी त्याला आता बेड्या ठोकल्या आहेत.

गणेश खांडवे या शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार आणि 'अट्रॉसिटी' कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती पोलिस (Police) उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिली. या शिक्षकाने यापूर्वी देखील आश्रम शाळेतील मुलीबरोबर गैरवर्तन केल्याचे समोर येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे.

असा आला प्रकार उघडकीस

एका मुलीने तिच्या आईला पाच एप्रिलला फोन करून, खांडवे कसा वाईट वागतो, याची तक्रार केली होती. यावर त्या मुलीची आई सात एप्रिलला भेटायला आश्रम शाळेत आली. त्यावेळी मुलीने आईला खांदवे सर हातात हात घेऊन कसे वाईट वागतात, याची माहिती दिली. दिलेल्या माहितीने मुलीच्या आईला धक्का बसला.

मुलींना दाखवायचा अश्लील चित्रफित

मुलगी आईला हा प्रकार सांगत असतानाच, आश्रमातील इतर सात ते आठ मुली या मायलेकीजवळ जमल्या होत्या. त्यातील आणखी दोन मुलींनी खांडवे कसे अश्लील चाळे करतो, याची माहिती दिली. या माहितीने संबंधित महिलेला धक्काच बसला. त्यानंतर काही मुलींना मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत देखील दाखवल्याची तक्रार मुला-मुलींनी त्या महिलेकडे केली. या धक्कादायक माहितीने संबंधित महिला चांगलीच हादरली. या सर्व मुलींना घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केली.

गणेश खांडवेला अटक

राहुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, संबंधित आरोपीचा लगेचच शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश खांडवेला पोलिसांची चाहूल लगताच तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याला आज अटक केली आहे. मात्र या घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT