Prajakt Tanpure 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll Crisis : तनपुरेंच्या ‘एकला चलो’ने समीकरणं ढवळली; पवार राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे शिवसेना 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

Prajakt Tanpure decision to contest independently triggers political movement, as Sharad Pawar calls a Mumbai meeting to finalize NCP candidate for Rahuri bypoll : प्राजक्त तनपुरेंनी अपक्ष लढवण्याच्या तयारीनंतर राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी शरद पवार यांची आज मुंबईत बैठक बोलावली आहे.

Pradeep Pendhare

Rahuri Assembly Bypoll : निवडणूक जिंकायचीच, या एकमेव उद्देशाने राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी एक ना अनेक उमेदवारांनी कंबर कसली आहे. त्यातून महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होऊन बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी तयार नसल्यामुळे पर्यायी उमेदवार कोण, तो द्यायचा कोणी, यातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात राहुरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी राष्ट्रवादीच्या 'तुतारी वाजवणारा माणूस' पक्षचिन्हावर निवडणूक लढवली होती. परंतु आता तनपुरे शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत नाहीत.

परिणामी, काँग्रेसने (Congress) उमेदवार देण्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने देखील उमेदवार देण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडतील उमेदवारीसाठी अशी रस्सीखेच सुरू असतानाच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

शरद पवार यांनी, यासाठी आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीत यामुळे आणखी गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अहिल्यानगरमध्ये नुकताच बैठक झाली. प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह खासदार नीलेश लंके, दक्षिण जिल्हाध्यक्ष दादा कळमकर आदी उपस्थित होते.

पक्ष फुटल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली असली तरी कार्यकर्ते हेच खरे बळ आहे, असे अंकुश काकडे यांनी सांगितले. मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होऊन पर्यायी उमेदवार ठरवला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. आता महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवली जाईल की बहुरंगी रस्सीखेच होईल, नेमका काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT