Shivaji Kardile, Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kardile Vs Tanpure : कर्डिले अन् तनपुरे समर्थकांमध्ये धुमश्चक्री; गोळीबार, चौघे जखमी

Rahuri assembly violence between Shivaji Kardile and Prajakt Tanpure supporters: राहुरी विधानसभा मतदारसंघातील गुंजाळे गावात शिवाजी कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे समर्थकांमध्ये हाणामाऱ्या झाल्या.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे कर्डिले यांचा विजय झाला. याच विजयाच्या जल्लोषातून राहुरीतील गुंजाळे गावात धुमश्चक्री झाली.

या हाणामाऱ्यांमध्ये गोळीबार झाला. तसेच एकमेकांविरोधात कुऱ्हाडी चालवण्यात आल्या. राहुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

राहुरीतील गुंजाळे गावात भाजपचे (BJP) कर्डिले समर्थकांकडून तुफान जल्लोष सुरू होता. फटाके फोडले जात होते. यातून राहुरी गुंजाळे गावातील बसस्थानक चौकात कर्डिले-तनपुरे समर्थक असलेले संजय नवले आणि बाबा चेडवाल एकमेकांविरोधात भिडले. यात एका कार्यकर्त्याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याने भाऊसाहेब नवले यांच्या पायाला गोळी लागली. नवले आणि चेडवाल यांनी हाणामाऱ्यांमध्ये एकमेकांविरोधात कुऱ्हाडीचा वापर केला.

या धुमश्चक्रीत चौघे गंभीर झाले आहेत. राहुरी पोलिसांकडे (Police) परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. संजय शिवाजी नवले, त्याचा भाऊ भाऊसाहेब नवले, बाबा चेडवाल आणि सोन्याबापू चेडवाल जखमी झाले आहे. भाऊसाहेब नवले याच्या पायाला गोळी लागली आहे. तसेच कुऱ्हाडीने मार लागल्याने काही जण जखमी झाले आहे. या जखमींवर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नवले आणि चेडवाल यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याची माहिती राहुरी पाोलिसांना समजताच, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे अतिरीक्त बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत भाजचे शिवाजी कर्डिले आमदार झाले. कर्डिले यांनी गेल्या पंचवार्षिकच्या पराभवाचा वचपा घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT