Prajakt Tanpure Rahuri Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri By Election : “भाजपची गाडी फुल!” विखेंचं विधान; तनपुरेंच्या सीटसाठी ‘मामा’ जयंतराव फिल्डिंग लावणार?

BJP MP Sujay Vikhe reacts to Prajakt Tanpure alleged moves to secure a BJP ticket for the Rahuri Assembly by-election : राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले प्राजक्त तनपुरेंच्या चर्चांवर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Rahuri assembly bypoll news : राहुरी पोटनिवडणुकीच्या घोषणेची शक्यता असल्याने, मतदारसंघात वेगवान हालचाली वाढल्या आहेत. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले, हे दोघं निवडणुकीची तयारी करत असतानाच, त्यांना एकाच गाडीत बसायचं आहे. तनपुरे यांनी भाजपकडे चाचपणी सुरू केली आहे.

यावर सुजय विखे पाटील यांनी, भाजपमध्ये येण्यास अनेक इच्छुक आहेत. परंतु आमची गाडी भरलेली आहे. आणखी किती जणांना बसवणार, असे म्हटले आहे. विखे पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर तनपुरेंचे मामा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील भाच्यासाठी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, ते कोणते सीट मिळवून देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

राहुरी विधानसभा पोट निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुरी आणि बारामती पोट निवडणुकांवर सत्ताधाऱ्यांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. राहुरीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इथं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी फिल्डिंग लावल्याचं समोर येत आहे. तशा मतदारसंघात चर्चांनी वेग पकडला आहे.

तनपुरे यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर चढला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अहिल्यानगर जिल्हा हिंदुत्वाची प्रयोगशाळा ठरला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा (Hindutva) जो नारा देईल, त्याला सत्तेचा सहारा मिळेल, अशी स्थिती आहे. यामुळे तनपुरे यांनी मतदारसंघात सक्रिय होताना, खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेतलेला दिसतो आहे.

राहुरी मतदारसंघाची रचना बघितल्या, ती अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या अवतीभोवती आहे. अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या मतदारसंघाभोवती आहे. आमदार जगताप यांनी प्रखर हिंदुत्व पुकारलं आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ते हिंदुत्वावर स्वार झाले आहेत.

जगतापांची निर्णायक भूमिका

याचा परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यात देखील दिसतो आहे. राहुरी मतदारसंघात राहुरीसह नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्यातील काही भाग येतो. यातून आमदार जगताप यांनी मेहुणे अक्षय कर्डिलेंसाठी कंबर कसली आहे. असे असले तरी,आमदार जगताप यांच्या प्रखर हिंदुत्वामुळे तनपुरे यांनी थेट भाजपकडे फिल्डिंग लावून चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.

कर्डिले मुंबईत सक्रिय

तनपुरे मतदारसंघात आक्रमक झाले असतानाच, भाजपकडून इच्छुक असलेले अन् राजकीय पुर्नवसनाच्या तयारी असलेले दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले मुंबईत सक्रिय झाले आहे. कर्डिले यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सहानुभूतीची लाट ओसरली?

शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघात भावनात्मक लाट निर्माण झाली होती. शिवाजी कर्डिले यांच्या निधनाला आता सहा महिने झालेत. त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्याभोवती असलेली सहानुभूतीची लाट काहीशी ओसरल्याचे दिसते. पण शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांचे नगर तालुक्यातील जाळे अक्षय कर्डिले यांच्याबरोबर उभे आहे. राहुरी आणि पाथर्डीमधील कार्यकर्त्यांचे जाळे काहीसे विखुरले आहे. याचा फायदा घेण्यासाठी तनपुरे यांनी मतदारसंघात भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा घडवून आणत आहेत, अशी देखील चर्चा आहे.

विखे पाटलांचं सूचक विधान

प्राजक्त तनपुरे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असतानाच, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तनपुरेंना भाजपचं दार बंद असल्याचं सूचक विधान केलं आहे. विरोध केला आहे. भाजपमध्ये येण्यास अनेक इच्छुक आहे. परंतु आमची गाडी भरलेली आहे. आणखी किती जणांना बसवणार, अशी प्रतिक्रिया देत विरोध दर्शवला आहे.

राजकीय गरमा-गरमी

विखे पाटील यांच्या सूचक विधानावर कर्डिले यांचे कार्यकर्ते सुखावले असले तरी, मुंबई भाच्यासाठी मामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील कोणती खेळी करून, सीट मिळवून देतात, याकडे लक्ष लागलं आहे. जयंतराव हे भाचा प्राजक्तसाठी मुंबईत सक्रिय झाल्याची राहुरी मतदारसंघात चर्चा आहे. उन्हामुळे तापलेल्या वातावरणात, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच गरम करणार अन् त्याची झळ अहिल्यानगरपर्यंत जाणवणार, असे एकंदर वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT