Rahuri By Election : राहुरीवर मुंबईत मोठं राजकीय मंथन! कर्डिले-मुख्यमंत्री भेटीत विखे-जगतापांची एंट्री

Leaders discuss strategy in Mumbai for the upcoming Rahuri by-election in Ahilyanagar district : राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुंबईत जोरबैठका सुरू झाल्या आहेत. अक्षय कर्डिले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचं समोर येत आहे.
Rahuri By Election
Rahuri By ElectionSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुंबईत बैठकींना वेग आला आहे. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गडबडीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी भेट घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अक्षय कर्डिले यांच्याबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे मेहुणे अक्षय कर्डिले हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्पाॅट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघाची देखील पोट निवडणुकीची (Election) तयारी सुरू आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. राहुरी मतदारसंघातून नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.

शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे. पण त्यांच्या उमेदवारीवर नक्की शिक्कामोर्तब होणार का? याची उत्सुकता आहे. यातच आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्षय कर्डिले यांनी भेट घेतली. या बैठकीवेळी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

Rahuri By Election
Madhi Yatra News : मढी यात्रेत गोंधळ? वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप; पोलिस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल, थेट DySPकडे तक्रार

या बैठकीत नेमकं काय ठरलं, हे काही अजून पुढं आलं नाही. परंतु अक्षय कर्डिले मतदारसंघात अ‍ॅक्टिव्ह झाले आहे. अक्षय कर्डिले यांचे प्रतिस्पर्धी कोण हा देखील विषय चर्चेचा आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील मतदारसंघात सक्रिय आहेत. परंतु ते नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता आहे.

Rahuri By Election
Rahuri Crime : धक्कादायक! 15 जणांचा पोलिसांवर हल्ला; कपडे फाडेपर्यंत मारहाण, एकाने उचलला थेट दगड...

तनपुरे भगवा घेत सक्रिय...

प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यात भगवा पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी दिसते आहे. याशिवाय ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. तनपुरे मतदारसंघात सक्रिय असून, ते हिंदुत्वाचे विचार बोलून दाखवत असल्याने ते भाजपकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय वाटचालीत, त्यांचे मामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. जयंत पाटील यांच्याकडून प्राजक्त तनपुरे यांना कोणता निरोप येतो, अन् राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये ते तनपुरेंसाठी नेमकी कोणती फिल्डिंग लावतात, याची उत्सुकता आहे.

शरद पवार निर्णय घेणार

अक्षय कर्डिले अन् प्राजक्त तनपुरे यांच्यातच पोटनिवडणुकीत लढत होईल, असं जवळपास निश्चित असल्याचं राजकीय विश्लेषकांचं निरीक्षण आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीत राहुरी आणि बारामती मतदारसंघात स्वतःचे उमेदवार देऊन, निवडणूक लढवली होती. आता दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीत शरद पवार इथं कोणता निर्णय घेतात, याकडे देखील लक्ष लागलं आहे.

शरद पवार राष्ट्रवादी तयारीत?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून अशी माहिती कळतेय की, या दोन्ही जागांवर निवडणूक लढायची. शरद पवार देखील या दोन्ही जागा लढवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने पक्षातील काही नेते सक्रिय झाल्याचे दिसतात.

बारामतीसाठी निर्णय होईल; पण...

पण भाजपकडून, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या दोन्ही जागा, बिनविरोधक करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात सत्ताधारी भाजप ज्यापद्धतीने राजकारण करत आहे, त्यावरून या दोन्ही जागा बिनविरोध होतील, असं काही वाटत नाही. एकवेळ बारामतीबाबत निर्णय होऊ शकतो. पण राहुरीसाठी बिनविरोधचा निर्णय होणे कठीण आहे, असे जाणकार सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com