Rahuri bypoll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस दिल्लीतून ग्रीन सिग्नल देताच, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या अनुषंगाने सक्रिय झाले. तोच भाजपचे अहिल्यानगरमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांना संगमनेरच्या निवडणुकीतील पराभवावरून डिवचलं आहे.
'थोरातांनी राहुरीपेक्षा संगमनेरची निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती', असा टोला मंत्री विखे पाटील लगावला.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलं आहे. तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने सक्रिय झाले आहे. यावर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी थोरातांना चांगलंच डिवचलं.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "राहुरीची (Rahuri) निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतलेली दिसते. आमची हरकत नाही. त्यांनी संगमनेरची निवडणूक अशीच गांभीर्याने घ्यायला हवी होती."
राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहेत. अजून बराच कालावधी जायचा आहे. पाहू काय करता येईल ते! असे सूचक म्हटलं.
राहुरीसाठी महायुतीमधील मित्रपक्षाच्या प्रतिनिधींनी अर्ज नेले आहे. विशेष करून, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अर्जन नेले आहे. त्यामुळे महायुतीकडूनच भाजप आव्हान मिळत आहे. यावर कसा तोडगा काढला जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीत देखील एकमत दिसत नाही. काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचे जाहीर करताच, नेते बाळासाहेब थोरात सक्रिय झाले आहेत. थोरातांनी महाविकास आघाडी आमच्याबरोबर असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अजून उमेदवारीबाबत निर्णय घेतलेला नाही.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारसंघात सक्रिय असले, तरी ते नेमक्या कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित नाही. तनपुरेंची भूमिका गुलदस्त्यात असल्याने विरोधकांची धास्ती वाढल्याचे सांगितलं जात आहे. त्यांचे जवळचे पदाधिकारी आणि कट्टर कार्यकर्ते हिंदुत्वाच्या मुद्यावर अपक्ष समोरे जाऊ, अशी भाषा करत आहेत. त्यामुळे लढत रंगतदार होणार असल्याची स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.