Rahuri Bypoll : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील विसंगती आता उघड होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने गोविंद मोकाटे यांना एबी फार्म दिला आहे. गोविंद मोकाटे यांनी लगेचच आपण मविआचे उमेदवार आहोत असा सूर अळवला आहे.
काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु त्यांना एबी फाॅर्म दिलेला नाही. हा तिढा असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे स्थानिक नेते रावसाहेब खेवरे यांनी राहुरी तालुक्याच्या अस्मितेसाठी उमेदवारी करणारच, असं जाहीर केलं आहे. 'मातोश्'रीवरून आदेश आल्यास तो डावलणार नाही. पण 'मातोश्री'वरून आदेश कोणाला येईल, असे प्रतिआव्हान देखील खेवरे यांनी दिलं आहे.
शिवसेना ठाकरे सेना (Shiv Sena UBT) पक्षाचे रावसाहेब खेवरे म्हणाले, "माझी उमेदवारी, ही मी बंडाबोरी समजत नाही. तालुक्याच्या अस्मितेसाठी मी निवडणूक लढत आहे. तालुक्याचा आमदार पाहिजे म्हणून मी निवडणुकीच्या मैदानात आहे. प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात असते अन् मी जर उमेदवारी केली असती, तर मी याला शंभर टक्के बंडखोरी, असे म्हटले असते. प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने मला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे."
राहुरी (Rahuri) मतदारसंघातील कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार, यावर बोलताना रावसाहेब खेवरे यांनी, राहुरी तालुक्यांमध्ये काहीच नाही. एखादा युवक शिकल्यानंतर त्याने कुठे जायचं इथून त्याची सुरुवात आहे. सगळा तालुका उध्वद्स्त झालेला आहे. मी 32 वर्षांपासून शिवसैनिक आहे. जनतेच्या काय समस्या आहेत हे मला ज्ञात आहे. त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जात आहे, असे सांगितले.
'मातोश्री'वरून निरोप आल्यास निवडणुकीमध्ये थांबणार का? तर यावर रावसाहेब खेवरे म्हणाले, "'मातोश्री'वरून आदेश आल्यास नक्की मी निर्णय घेईल, मी तो टाळू शकत नाही. परंतु 'मातोश्री'ने आदेश द्यायचा कुणासाठी? आता जे उमेदवार दिलेले आहेत, ते कोणत्या पक्षाचे फाउंडर नाहीत." प्राजक्त तनपुरे असते, तर मी नक्कीच विचार केला असता, कारण की ते एका पक्षाचे फाउंडर आहेत. काँग्रेसने एबी फॉर्म दिलाय, राष्ट्रवादीने देखील एबी फॉर्म दिलाय, तो एबी फॉर्म मला देखील देत होते. पण माझा चेहरा हा कडवट हिंदुत्वचा आहे, 18 पगड जातीचं माझं हिंदुत्व आहे, त्या सर्वांना बरोबर घेऊन जाणार माझं हिंदुत्व आहे, असे खेवरे यांनी स्पष्ट केलं.
उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली आहे का, यावर रावसाहेब खेवरे यांनी, 'उद्धव ठाकरे साहेबांना दोन वेळा भेटलो आहे. परंतु ठाकरे साहेबांनी, प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तिथे माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, ते असताना आपल्याला तिथे उमेदवारी देता येणार नाही,' अशी भूमिका मांडल्याचे सांगितले.
'काल अचानक वेगवान घडामोडी घडल्या, अन् सर्व काही राजकीय खुलासा झाला. प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी दाखल न करण्याची भूमिका ऐनवेळी जाहीर केली, हीच भूमिका दोन दिवसांपूर्वी किंवा एक दिवस अगोदर केली असती, तर तर मला देखील पक्षाकडून नक्कीच एबी फॉर्म मिळाला असता,' असा दावा खेवरे यांनी केला आहे.
राहुरी तालुक्याचे अस्मिता म्हणून, मी प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर आहे, ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत. परंतु प्रचाराच्या वेळेस त्यांनी माझ्याबरोबर राहावे, अशी माझी विनंती असेल, असे रावसाहेब ठेवले यांनी म्हटले आहे. कारण की त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात मी देखील सक्रिय राहिलो आहे, असेही खेवरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.