NCP Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll Rift : 'राहुरी'साठी काँग्रेसचे दोन शिलेदार मैदानात; शरद पवार 'मविआ'साठी सूत्र फिरवणार

Despite NCP Sharad Pawar faction nominating Govind Mokate for Rahuri bypoll, two Congress candidates from MVA have filed nominations, indicating internal rift : राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याने मविआचे सूत्र जुळवण्याची जबाबदारी शरद पवारांवर वाढली आहे.

Pradeep Pendhare

Sharad Pawar NCP Rahuri : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत, काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरले आहेत. पक्षाने त्यांना एबी फाॅर्म दिले नसले, तरी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या उमेदवारांबाबत पक्ष काय भूमिका घेणार? अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काँग्रेस कोणता आदेश देणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारी न करण्याचा निर्णयानंतर, शरद पवार कोणती भूमिका घेतात? काँग्रेसला काय निरोप देतात? महाविकास आघाडी एकत्र आणणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकीला समोरे जाताना, शरद पवार महाविकास आघाडीचे सूत्र जुळवून आणतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) उमेदवार देण्याचं निश्चित केलं होतं. तसा दिल्ली हायकमांडने देखील आदेश दिला. ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात सक्रिय होत, उमेदवाराची चाचपणी देखील केली होती. परिस्थितीकडे लक्ष ठेवून असून, निश्चित उमेदवार देणार आणि तो निवडून येणार, असे विधान थोरात यांनी केलं होतं.

आता राहुरी पोटनिवडणुकीचे काहीसे चित्र स्पष्ट झाले आहे. 30 उमेदवारांनी 42 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

महाविकास आघाडीकडून राहुरीची जागा ही शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीकडे राहिली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरवातीला अपक्ष निवडणुकीला समोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे गोविंद मोकाटे यांनी शरद पवार राष्ट्रवादीकडून एबी फाॅर्म देण्यात आला.

लांबे अन् म्हसे काँग्रेसचे उमेदवार

असे असले, तरी काँग्रेसकडून सुरवातीला राहुरी पोटनिवडणूक लढण्याची तयारी करण्यात आली होती. त्यानुसार सुरेश लांबे आणि अर्थव म्हसे या काँग्रेसच्या उमेदवारींनी अर्ज नेत, भरले देखील आहेत. या दोघांनी अर्ज भरले असले, तरी त्यांना पक्षांनी अजून एबी फाॅर्म दिलेले नाहीत.

भाजपला निवडणूक सोपी नाही

शरद पवार राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना एबी फाॅर्म दिल्याने, काँग्रेस आपले उमेदवार निवडणुकीत माघार घेतील, असे बोलले जात आहे. यावर आता काय निर्णय होतो? बाळासाहेब थोरात यांना हायकमांडचा कोणता आदेश येतो? याकडे लक्ष लागलं आहे. परंतु शरद पवार हे राहुरीत महाविकास आघाडीचे गणित जुळवून आणतील आणि भाजपला जेवढी सोपी वाटते, तेवढी निवडणूक सोपी राहणार नाही, अशी पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, सुरवातीलाच, महाविकास आघाडीत, ही जागा शरद पवार राष्ट्रवादीची आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर काँग्रेस दावेदार असेल असे सांगितले. आता शरद पवार राष्ट्रवादी मैदानात आल्याने, ठाकरेंची शिवसेना शरद पवार राष्ट्रवादीबरोबर असेल, हे स्पष्ट आहे. परंतु काँग्रेसच्या दोघांच्या उमेदवारीवर, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT