CM Devendra Fadnavis 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakta Tanpure : मुख्यमंत्र्यांकडून काय मिळालं आश्वासन? माजी मंत्री तनपुरेंनी शेवटच्या क्षणी फिरवलेला निर्णय कितपत योग्य?

Speculation rises over what assurance Prajakt Tanpure received from CM Devendra Fadnavis after opting out of the Rahuri bypoll : राहुरी पोटनिवडणूक न लढविणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणता शब्द मिळाला, याची चर्चा रंगली आहे.

Pradeep Pendhare

Prajakt Tanpure Rahuri Bypoll : हिंदुत्वावर स्वार झालेले, अन् अपक्ष उमेदवारी करणारच, असे सांगणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केला.

हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राहुरीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन झाला. त्यानंतर भाजपची अपेक्षित सर्व गणितं जुळून आली.

अक्षय कर्डिले यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहुरीत दाखल झाले होते. त्याचवेळी त्यांनी तनपुरे यांना संपर्क करून, तुमच्या भेटीसाठी येत आहोत, असे सांगितलं. चव्हाण आणि विखे पाटील हे थेट, तनपुरेंच्या कार्यालयात दाखल झाले. तिथं बंद केबिनमध्ये तिघांमध्ये चर्चा झाली.

त्याचवेळी चव्हाण आणि विखे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी तनपुरेंशी दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली. तनपुरेंनी सुरवातीला निवडणूक का लढवत आहे, हे स्पष्टीकरण दिले. आपली भूमिका मांडतानाच, सर्व मागण्या पूर्ण होतील, असा शब्द मुख्यमंत्र्यांकडून मिळाला अन् पुढच्याच क्षणी तनपुरेंनी निवडणुकीसाठी तयार केलेला अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. फोन नेमकी काय चर्चा झाली यावर आता काथ्याकूट सध्या सुरू आहे.

'या सर्व घडामोडीनंतर प्राजक्त तनपुरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली, त्यात त्यांनी, मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्नांवर भाष्य केले. चव्हाण अन् विखे पाटीलांनी भेट घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे संवाद झाला पाहिजे, असं वाटल्याची ही भेट झाली. या भेटीत त्यांनी निवडून लढू नये,' अशी विनंती केली, असे तनपुरे यांनी म्हटलं.

मंत्र्यांची विनंतीला तनपुरेंकडून मान

'विद्यमान आमदारांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील मुलगा किंवा पत्नीला उमेदवारी दिली जाते. त्यानुसार सहानुभूतीपूर्वक विचार करावा. तशी महाराष्ट्राची प्रथा, परंपरा राहिली आहे. तीच विनंती त्यांनी केली. पण मी देखील माझी बाजू मांडली. तालुक्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधले,' असे तनपुरे यांनी सांगितलं.

राहुरीतील जमीन अधिग्रहणाचा मुद्दा

राहुरी तालुक्याला, गेल्या 20 वर्षांत अत्यल्प प्रतिनिधीत्व मिळालं आहे. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. राहुरीतील सात हजार एकर जमीन अॅम्युनेशन पार्कसाठी अधिग्रहीत होणार होती. तसं उद्योगमंत्र्यांच पत्र आमच्या हाती लागलं आहे. हा तालुक्यासाठी हानीकारण विषय आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, अशी आमची भूमिका आहे, असे तनपुरेंनी सांगितलं.

तनपुरेंचं राजकीय पुर्नवसन कसं होणार

मुळा धरण, केके रेंजच्या पुनर्स्थापिताचा अजूनही प्रश्न आहे. तनपुरे कारखान्याच्या 'एनसीडीसी'चा प्रस्तावावर सरकार सकारात्मक हवी. नगरपालिकासाठी निधी, तालुक्यासाठी एमआयडीसीची मागणी आहे. या सर्वावर सरकार सकारात्मकता दर्शवल्याचा दावा तनपुरेंनी केला आहे. याच सर्व मुद्यांवर तनपुरेंनी मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करून घेताना, राजकीय पुर्नवसन कसं होणार, यावर शब्द मिळाला का, हे तनपुरेंनी सांगण्याचं टाळलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT