Rahuri Nagar Parishad Election Result Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Nagar Parishad Election Result : शरद पवारांच्या शिलेदारानं भाजपचा उडवला धुव्वा; 17 नगरसेवक निवडून आणत नगराध्यक्षपद खेचून घेतलं!

Rahuri Municipal Election Sharad Pawar NCP Prajakt Tanpure Supporters Win 17 Seats : राहुरी नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने सत्ता मिळवली आहे.

Pradeep Pendhare

Rahuri municipal election : राहुरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने यश मिळवलं आहे.

भाजप महायुतीचा धुव्वा उडवत, तिथं 24 पैकी 17 जागांवर प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. शहर विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. भाजपचे सात जागांवर उमेदवार निवडून आले आहे. राहुरी नगरपालिका निवडणुकीत राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांची उणिव जाणवली.

राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी 72.58 टक्के मतदान झालं. मतदानाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. मतदानाचा टक्का वाढल्याने राहुरी नगरपालिकाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता होती. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी राहुरीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मंत्री विखे पाटील अन् माजी मंत्री तनपुरे यांच्यात राजकीय द्वंद राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं रंगलं होतं.

राहुरी नगरपालिकेवर तनपुरे (Prajakt Tanpure) कुटुंबियांची एकहाती सत्ता राहिली आहे. स्थानिक मतदारांनी शहराचे कारभारी म्हणून नेहमीच तनपुरे कुटुंबियाला पाठबळ दिलं. केंद्रासह राज्यामध्ये विरोधकांना जागा दाखविणाऱ्या भाजपने राहुरीतही तनपुरे गटाचा धक्का देण्याची तयारी केली होती.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तनपुरे कारखाना तसेच बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांसह रावसाहेब चाचा तनपुरे यांना सोबतीला घेत सावध पावित्रा घेतला. परंतु चाचा तनपुरे यांच्यासोबतच्या युतीनंतरही विकास आघाडीला काही प्रभागामध्ये स्वकीयांची बंडखोरी रोखता आली नव्हती. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

शिवाजी कर्डिले यांची उणिव जाणवली

दुसरीकडे भाजपने आपल्या पॅनलमध्ये नाराजांची बंडखोरी होऊ न देता ताकद निर्माण केली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः लक्ष ठेवून होते. परंतु ते एकटे लढत होते. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांची या निवडणुकीत उणिव जाणवली. यातच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला सोडून देत वेगळी चुल मांडली.

महायुतीत फाटाफूट झाली...

महायुतीमध्ये फाटाफूट होऊन एकनाथ शिंदे शिवसेनेने नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांच्या रुपाने उमेदवार तसेच 8 धनुष्यबाण चिन्ह असलेले तर अपक्ष पुरस्कृत 4 असे एकूण 12 नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले. तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब मोरे यांना उमेदवारी दिली. भाजपने चाचा तनपुरे यांचे खंदे समर्थक सुनिल पवार यांना पक्षात घेऊन ताकद दिली. यांसह वंचितकडून बापुसाहेब माळी हे उमेदवार उभे होते. तनपुरे यांच्या विकास आघाडीकडून व भाजपकडून सर्व जागेवर उमेदवार उभे केले होते.

तनपुरेंचं बेरजेचं राजकारण जिंकलं

परंतु, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संशयाची भूमिका घेत, बेरजेचं राजकारण करत, राहुरीत प्रचाराची धुरा संभाळली. कोणतीही नाराजी असल्यास स्वतः तनपुरे लक्ष ठेवून होते. यात प्रचारसभांचा धुरळा उडाला होता. वातावरण फिरत होते. परंतु निकालानंतर शरद पवार यांच्या शिलेदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीचा गड राखत शहर विकास आघाडीचा सत्ता नगराध्यक्षपदासह खेचून घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT