Police Inspector Pratap Darade
Police Inspector Pratap Darade  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pratap Darade : सातपुतेंची मागणी देसाईंची घोषणा अन् पीआयच्या बदलीविरोधात लोकं रस्त्यावर

सरकारनामा ब्यूरो

Police Inspector Pratap Darade transferred : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीमुळे राहुरीत सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ काही संघटनांनी आज राहुरीत रास्ता रोको आंदोलन केले. दराडे यांची बदली करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी आंदोकांनी केली.

राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (Pratap Darade) यांनी धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका आरोपीला पाठीशी घातल्याच्या आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनामध्ये केला होता. त्यानंतर सातपुते यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस निरीक्षक दराडे यांची तडकाफडकी बदलीचे आदेश देत त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची 15 दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. (Police Inspector Pratap Darade transferred)

मात्र, आता पोलीस निरीक्षक दराडे (Police Inspector Pratap Darade) यांच्या बदलीच्या निषेधार्थ राहुरीत अनेक संघटना एकवटल्या असून पक्ष संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज अहमदनगर (Ahmednagar) - मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure), रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारी तसेच ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

प्रताप दराडे यांच्या बदलीचा विरोध करत तब्बल दीड तास चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी वाहनांची मोठी रांग लागली होती. तर दीड तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं. तसेच गुन्हेगारीवर आळा बसवणाऱ्या आणि गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करू नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

विधानसभेत दराडेंच्या बदलीबाबत काय घटलं होतं?

अहमदनगरमधील राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत केली होती.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर धर्मांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. धर्मांतर करणाऱ्या आरोपीवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत हा प्रश्न आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता.

त्यानंतर सातपुते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी दराडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत पुढील पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. तसेच चौकशी होईपर्यंत पोलीस निरीक्षक दराडे यांची नगरच्या पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्याची घोषणा त्यांनी केली होती.

दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ काही संघटनांनी एकत्र येत आज राहुरीमध्ये (Rahuri) रास्ता रोको आंदोलन केले. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊ नये, असं या आंदोकाचं म्हणण आहे. तर आता यावर सरकार नमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT