Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil News : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा; चोवीस तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच

Congress News : गोदामाच्या चाव्याही पथकाने जप्त केल्या आहेत.

Mangesh Mahale

Dhule : धुळे ग्रामीणचे आमदार, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर छापा टाकण्यात आला आहे. अद्यापपर्यंत ही चौकशी सुरू असल्याचे माहिती आहे. 24 तास उलटल्यानंतरदेखील अद्यापही तपास यंत्रणा तपास करीत आहे. तपास यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

ही छापेमारी नेमकी कुठल्या कारणास्तव करण्यात आली आहे, याची सध्या कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळू शकलेली नसली तरी राजकीय आकसापोटी ही छापेमारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कुणाल पाटील यांच्यावर विदर्भातील लोकसभेची जबाबदारी सोपवताच त्यांच्या सूतगिरणीवर कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते. काही माजी कर्मचारी यांनी‎ नुकतीच प्रशासनाकडे तक्रार दिली होती.‎ या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असल्याची चर्चा आहे.

पुणे, नाशिक येथून आयकर विभागाचे पथक शनिवारी आले आहे. सुमारे‎ पाच कारमधून सकाळी हे पथक आले आहे. सूतगिरणीतील सुरक्षारक्षकांचे मोबाईल बंद करण्यात आले आहेत. दूरध्वनी कट करत गोदामाच्या चाव्याही पथकाने जप्त केल्या आहेत.

सुताच्या मालाला उठाव नसल्यामुळे विक्री होत नाही. गोदामात साठा पडून आहे. त्यामुळे आजपासून (१ ऑक्टोबरपासून) तिन्ही पाळ्यांचे कामकाज पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बिनपगारी बंद ठेवण्यात येत आहे. बाजारात सुधारणा झाल्यावर कामकाज पूर्ववत सुरू होईल, अशी सूचना सूतगिरणीच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे.

पथकाकडून‎ रविवारी सकाळपर्यंत कार्यालयात‎ कागदपत्रे तपासणी सुरू होती. सूतगिरणीचे ऑडिट पूर्ण झाले असून,‎ संस्था ‘क’ दर्जामध्ये मोडते, असे‎ असतानाही कारवाई झाली. आमदार कुणाल पाटील यांच्या‎ निवासस्थानाबाहेर दुपारी नेहमीप्रमाणे ५ ते ६‎ कार्यकर्ते व सुरक्षारक्षक तैनात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT