Akola : महाविकास आघाडीतच जागा वाटपावरून जोपर्यंत बोलणी होत नाही. तोपर्यंत उद्धव ठाकरे गट आमच्याशी बोलू शकत नाही, कारण ठाकरे गटाला कोणत्या जागा मिळतात ते पाहावे लागेल तेव्हाच आमची बोलणी होईल. मात्र, अद्यापही निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असून, पक्षाने तशी तयारी सुरू केली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.
राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याने वंचित बहुजन आघाडीने सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या झालेल्या युती संदर्भात सध्या संभ्रमाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जोपर्यंत महाविकास आघाडीत सामील असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला कोणत्या आणि किती जागा मिळतात. त्यावरूनच वंचित-शिवसेनेच्या युतीचे भवितव्य असल्याचे बोलले जात आहे, तर निवडणूका या वेळेवर लढायच्या नसतात तर तयारी करून लढाव्या लागतात असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी तयारी सुरू केली असल्याचे म्हटले आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे त्यांनी पूर्वीच जाहीर केले.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
शिवसेना उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आमची युती ही शिवसेना ठाकरे गटाशी असून, जोपर्यंत राष्ट्रपती, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बोलणी होत नाही. तोपर्यंत शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची बोलणी होणार नाही. कारण शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळतात. यावरूनच आमच्या जागा ठरणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्हाला तयारी करून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने सर्व ४८ जागांची तयारी केली आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसकडून उत्तर नाही...
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत पत्र देऊनही त्यावर अद्याप उत्तर आलेलं नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.