MNS Raj Thackeray News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray Nashik Visit : दोन दिवसांचा नाशिक दौरा राज ठाकरेंनी तीन तासांतच गुंडाळला ; अचानक मुंबईकडे रवाना, काय कारण?

Raj Thackeray abruptly ended his Nashik tour and returned to Mumbai within 3 hours : नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे नाशिक मनपा निवडणूक मनसेचे महत्वाचे मिशन असणार आहे. मात्र राज ठाकरे यांनी तीन तासांमध्येच नाशिकचा दौरा उरकून ते मुंबईकडे रवाना झाले.

Ganesh Sonawane

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे सोमवार (दि. 26) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व होतं. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे नाशिक मनपा निवडणूक मनसेचे महत्वाचे मिशन असणार आहे. मात्र राज ठाकरे यांनी तीन तासांमध्येच नाशिकचा दौरा उरकून ते मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे त्यांच्या या शॉर्टकट दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सोमवारी (दि. 26) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. हॉटेल एसएसके येथे त्यांचे आगमन झाले. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी छोटेखानी आढावा बैठक घेतली. तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी देखील त्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसांचा दौरा नियोजित असतानाही राज ठाकरे लगेचच अवघ्या तीन तासांत दौरा उरकून अचानक मुंबईकडे रवाना झाले. नाशिकनंतर राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते मात्र त्यांनी तो दौराही रद्द केला. गेल्या पंधरा दिवसांत राज ठाकरे यांचा नाशिक दौरा दोन वेळा रद्द झाला होता.

दोन वेळा दौरा रद्द झाल्यानंतर अखेर आज ते नाशिकमध्ये आले होते. दोन दिवस ते मुक्काम करणार होते. परंतु अवघ्या तीन तासातच ते मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज ठाकरे हे काही खासगी कारणासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची किंवा नाही यासंदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जात होती.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आजूनही नाशिकमध्ये बऱ्यापैकी संघटन टिकून आहे. त्यामुळे उबाठा व मनसे एकत्र आल्यास नाशिक महागरपालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने ते चर्चा करुन काही निर्णय घेतील असे बोलले जात होते. मात्र तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT