Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झाले तरी.. माणिकराव कोकाटेंनी काढला चिमटा

Manikrao Kokate reacts to Chhagan Bhujbal's Deputy CM buzz with a sarcastic comment : छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. त्यावरुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना चिमटा काढला आहे.
Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate
Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी ठरवलं छगन भुजबळ उपमुख्यमंत्री देखील होतील असं गिरीश महाजन म्हणाले होते. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली. महाजन यांच्या नंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील भुजबळांना यावरुन चिमटा काढला आहे.

छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय ते पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू असा उपरोधिक टोला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदा संदर्भातील निर्णयही आजून झालेला नाही. त्यावर विचारले असता ते म्हणाले की, आम्ही कुणीही कुठलीही इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करत नाही असं कोकाटे म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांच्या कोट घालण्यावर रोहित पवार यांनी केलेल्या शेरेबाजीला उत्तर देताना ते म्हणाले की, मी आज नाहीतर पहिल्यापासून कोट घालतो. माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी देखील कोट घालण्या लायक व्हावा, त्याची आर्थिक परिस्थिती व राहणीमान सुधारावं ही माझी इच्छा आहे. समजा रोहित पवारांना असं वाटत असेल की, मला कोट नाही, शेतकऱ्यांना कोट नाही आणि कृषीमंत्रीच कोट घालतात तर आम्ही त्यांनाही कोट देऊ असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate
Manikrao Kokate : कांदा सडला, शेतकरी रडला.. तरी अधिकारी फिरकेना ; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्याला कोणी वाली नाही..

दरम्यान राज्यात सुरू असलेल्या पावसाला आता अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही. कारण मान्सूनही आता राज्यात दाखल झालेला आहे. राज्यात सरासरी 120 मिलिमीटर पाऊस झाला असल्याने सर्वच ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com