Raj Thackeray & Sudam Kombade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: मनसेचे तब्बल १८० पदाधिकारी, शहरप्रमुखाला पदाधिकाऱ्याची नावे तरी आठवतील का?

Raj Thackeray politics, Confused MNS leaders appointed gigantic executive-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिकची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

Sampat Devgire

MNS Nashik News: कडक शिस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव घेतले जाते. या पक्षाने नाशिक शहरासाठी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीने अनेक नवे गोंधळ होण्याची शक्यता आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुदाम कोंबडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती यापूर्वी झाली होती. आता नाशिक शहरासाठी कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली आहे. मात्र ही कार्यकर्णी एवढी मोठी आहे की, तिचा उद्देश तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

विशेष म्हणजे या कार्यकारणीत एवढे पदाधिकारी आहेत की, अध्यक्षांना त्यांची नावेही आठवणार नाही. १८० जणांची ही कार्यकारिणी आहे. यामध्ये तब्बल २७ उपाध्यक्ष आणि २३ शहर संघटक आहेत.

विभागीय अध्यक्ष या पदा ऐवजी विधानसभा अध्यक्ष अशी पदनिर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी प्रसाद सानप, मध्य मतदारसंघासाठी धीरज भोसले तर पश्चिम मतदार संघासाठी नितीन माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहर सचिवपदी नितीन अहिरराव आणि योगेश लभडे, साहेबराव खर्जुल, सचिन सिन्हा, गणेश कोठुळे, प्रकाश कोरडे, ज्ञानेश्वर बागडे, गणेश जायभावे, विशाल भावले आदी सत्तावीस उपाध्यक्ष आहेत. नाशिक मध्य मतदार संघाच्या निरीक्षक पदी सत्यम खंडाळे यांचे नियुक्ती झाली आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती करण्याचा कदाचित विसर पडला असावा. सध्याचा काळ विधानसभा निवडणूक रणनीती ठरविण्याचा आहे. सर्वच पक्ष त्यासाठी काम करीत आहेत. राज्यात स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

त्या दृष्टीने नाशिकमध्ये तशा हालचाली अभावानेच दिसतात. त्यामुळे कार्यकारिणी तर नियुक्त केली मात्र विधानसभा निवडणूक तयारीचे काय? असा संभ्रम अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होऊ शकतो. तशी स्थिती कार्यकर्त्यांमध्ये जाणवू लागली आहे.

नाशिकचे प्रभारी आणि प्रदेश सचिव अॅड किशोर शिंदे आणि सहसंघटक अॅड गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारणी नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवार देणार आहे.

कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर त्याकडे लक्ष देण्यात येईल, असे दिसते. एकंदरच ही जम्बो आणि अवाढव्य कार्यकारिणी पाहता या पदाधिकाऱ्यांत समन्वय कसा निर्माण होईल? शहर प्रमुखाला आणि अगदी पदाधिकाऱ्यांनाही नेमके पदाधिकारी किती आणि त्यांचे नावे काय? हे तरी लक्षात राहील का असे बोलले जात आहे.

एकंदरच शिस्तीसाठी नाव घेतले जाणाऱ्या मनसेचे सध्याचे चित्र पाहता प्रक्षप्रमुख राज ठाकरे यांना "शिस्तीवर भरवसा नाय काय" असे शंका व्यक्त केली जाऊ शकते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT