raj thackeray  sakarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray On Bjp : "माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या महाराष्ट्रात...", राज ठाकरेंचा भाजपला टोला

Akshay Sabale

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर्षी वर्धापन दिन नाशिकमध्ये करण्याचं ठरवलं. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात दरवर्षी वर्धापन दिन साजरा करण्याचं आम्ही ठरवलं आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. तसेच, सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यांची मुलं कडेला घेऊन फिरलं जात आहे. तसलं सुख मला नको आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) भाजपला टोला लगावला आहे.

नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तेव्हा, राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) मनसैनिकांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. "राजकारणात वावरायचं, राहायचं आणि टिकायचं असेल, तर संयम लागतो. तुमच्या आजूबाजूच्या राजकीय पक्षांचं यश दिसत आहे. काहींना वाटतं 2014 मध्ये भाजपला नरेंद्र मोंदीमुळं ( Narendra Modi ) यश मिळालं आहे. पण, हे संपूर्ण श्रेय पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मी अनेक चढउतार पाहिले"

"अटल बिहारी वाजपेयी यांचं पहिलं सरकार 13 दिवसांचं होतं. दुसरं सरकार 13 महिन्यांचं आलं. नंतर साडेचार वर्षांचं आलं. परत 10 वर्षे काँग्रेसचं सरकार होतं. गेल्या 18 वर्षांत मी अनेक चढउतार पाहिले. चढ कमी आणि उतारच जास्त पाहिले. पण, संपूर्ण उतारात कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

"मनसेला यश मिळवून देणार म्हणजे देणार"

"आपल्याला यश निश्चत मिळणार आहे. ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे. त्यासाठी संयम लागतो. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. कारण, सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळत आहे. तसलं सुख मला नको आहे," अशी टोलेबाजी राज ठाकरेंनी भाजपवर केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT