Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray News : 'टोल का झोल' पोहोचवणार मुख्यमंत्र्याकडे; राज कडाडले

Raj Thackeray Nashik Visit : राज ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये दाखल...

Arvind Jadhav

Raj Thackeray Nashik News :

दर काही दिवसांनी जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातात. त्यावर चर्चा केली जाते. त्यातून काय साध्य होते. तुम्ही काय गांधी आणि गोडसेंना बोलावून साक्ष घेणार आहात काय? जे आहे ते वर्तमान. त्यावर बोला आणि भविष्य घडवा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इतिहासावरून वाद घालणाऱ्यांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची चाचपणी करण्याचे काम ठाकरे यांनी हाती घेतले आहे. याचसाठी ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना Raj Thackeray यांनी इतिहासांचे संदर्भ देऊन वाद घालणाऱ्यांना फैलावर घेतले.

'महागाई, पेट्रोलच्या किंमती यावर चर्चा करा'

नुकतेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन झाले. त्यात रणीजीत सावरकरांनी गांधी हत्येबाबत नवा दावा केला. गांधींजीची हत्या नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतील गोळीने झालीच नाही, असा निष्कर्ष सावरकरांनी आपल्या पुस्तकात मांडला आहे. याचवरून काँग्रेससह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केली. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

सातत्याने इतिहास उकरून काढला जातो. त्यावर वाद होतात. आता वादावर प्रकाश टाकयला तुम्ही गांधींना बोलावणार की गोडसेंना? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. वर्तमानात काय चाललंय त्याकडे लक्ष द्या. इतिहास उकरून आणि त्यावर वाद घालून तुमच्या हाताला काहीही लागणार नाही. मराठी माणसाला मुंबईत महाराष्ट्रात घरं नाकारली जातात. महागाई, पेट्रोलच्या किंमती यावर चर्चा करा आणि जुन्या गोष्टी सोडा, असा सल्ला राज यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'टोल नाक्यांवर लूट'

माझा टोलला विरोध नाही. मात्र, टोलवर रोख पैसे घेतले जातात. त्यातील पैसे लुटले जातात. पुढे ते पक्षनिधी म्हणून पोहच केले जातात. माझा या यंत्रणेवर आक्षेप आहे. मुंबई-पुणे हायवे तयार होऊन अनेक वर्ष झालीत. मग टोल का सुरू आहे? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला.

मागे मुंबईत आमच्या लोकांनी सर्व शुटींगच करून ठेवलंय. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पुराव्यानिशी सुरू असलेली लूट आम्ही मांडू. टोलच्या माध्यमातून निर्माण होणारा हा पैसा पक्षासाठी पोहोच केला जातो. मलाही ऑफर घेऊन आले होते. मात्र, समोर या तुमचं थोबाड रंगवतो, अशी धमकी त्यांना दिल्याची जुनी आठवणही ठाकरे यांनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT