Raj Thackeray On Bjp : कधी काळी कांद्याच्या दरावरून लोकसभेची निवडणूक पार पडली होती. याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. सध्या राम मंदिर सोहळ्याचं वातावरण आहे. पण, निवडणुकीतील मुद्दे बदलण्यास वेळ लागत नाही. राम मंदिर उभे राहिल्याचा आनंद मला आहे. पण, मी भाजपचा मतदार नाही. अनेक मतदार याच मानसिकतेचे असल्याचं सांगत रामनामाचा जप करणं, भाजपला तितके उपयोगी पडणार नाही, असा चिमटा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज ठाकरे म्हणाले, "1990 च्या दशकात हिंदुत्वाचे वारे जोरात वाहत होते. पुढे बाबरी मशिद पाडण्यात आली. त्यातून देशभरात दंगली उसळल्या. याची तीव्र प्रतिक्रिया निवडणुकीला उमटली. काँग्रेसच्या कट्टर हिंदू मतदारांनी काँग्रेसविरोधात मतदान केले. मात्र, पुढे हा मुद्दा चालला नाही. तो सरकारविरोधातील आक्रोश होता. 2014 मध्ये अशाच जनभावनेतून लोकांनी मतदान केले. बाबरी मशिद पडली, दंगल झाली आणि त्याचा भाजप आणि इतर पक्षांना फायदा झाला. याचा अर्थ राम मंदिर सोहळ्यातूनही भाजपला फायदा होईल, असे नाही. मतदारांचे समाधान महत्त्वाचे असते."
"राम मंदिर उभे राहिल्याचा सर्वांसह मलाही आहे. पण, मी भाजपचा मतदार थोडाच आहे. अनेक हिंदू या मताचे आहे. त्यामुळे भाजपच्या रामनाम जपण्याने लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, असे नाही," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"...तोपर्यंत काळाराम मंदिर आहेच"
"श्री राम मंदिर सोहळ्यानंतर सुरक्षेसाठी आयोध्येत प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लाखो भाविक अयोध्येत पोहचत आहेत. त्यामुळे सध्या अयोध्याला जाण्याचा विचार नाही. सगळ शांत झालं की अयोध्येला जाईन. तोपर्यंत आपलं काळाराम मंदिर आहेच," असं राज ठाकरेंनी सांगितलं.
"ईव्हीएमबाबत मी एकटाच लढलो"
ईव्हीएमबाबत संजय राऊत आणि विरोधकांकडून आगपाखड सुरू आहे. याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला. "ईव्हीएमबाबत मी सर्व प्रथम प्रश्न उपस्थित केला. मात्र, माझ्याबरोबर कोणी उभे राहिले नाही. आता त्यांची (महाविकास आघाडी) वेळ आहे," असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.