Thackeray Banner & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: राज, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याने महायुती घाबरली, उद्या बसणार सरकारला पहिला हादरा?

Raj Thackrey; Banners of Uddhav and Raj Thackeray displayed outside MNS office-मनसेच्या नाशिक शहराच्या कार्यालयाबाहेर झळकले राज आणि उद्धव ठाकरेंचे बॅनर, विजयी मेळाव्याची जय्यत तयारी

Sampat Devgire

Raj Thackrey News: हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने माघार घेतली. या पार्श्वभूमीवर उद्या मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संयुक्त मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्यामुळे नाशिकच्या समर्थकांत उत्साह आहे.

या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरात आनंद साजरा केला. शहरातील कार्यालयाबाहेर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फ्लेक्स झळकला. मेळाव्याच्या पूर्वसंध्येला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी नियोजनासाठी कार्यालयात जमली होती.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरात आज पदाधिकाऱ्यांचे बैठक झाली. या बैठकीत उद्याच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांची उपस्थिती आणि नियोजन यावर चर्चा करण्यात आली. उद्याचा मेळावा मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मोठ्या उत्सुकतेचा विषय आहे.

राज्यात हिंदी सक्तीच्या माध्यमातून भाजप आपला अजेंडा मराठी माणसांवर थोपण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांच्या या राजकीय अजेंडाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. हे दोघे मराठी या विषयावर एकत्र येणार असल्याने राज्यातील राजकारणाने कुस बदलली.

ठाकरे यांच्या बिगर राजकीय मोर्चाचा राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात धक्का घेतला. सुरुवातीला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने हिंदी सक्तीची बाजू घेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात ते तोंडघशी पडले. राज्य सरकारला हिंदी सक्तीचा आदेश मागे घ्यावा लागला हाच मनसेचा विजय आहे, असा दावा प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केला.

मुंबईला होणाऱ्या मेळाव्याला नाशिक शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जाणार आहेत. हा मेळावा म्हणजे राज्य सरकारच्या हुकूमशाही, भ्रष्टाचार, दहशतवाद, सत्तेचा दुरुपयोग याला आव्हान आहे. उद्याच्या मेळाव्यातून राज्य सरकारला पहिला मोठा हादरा बसेल असा दावा यावेळी त्यांनी केला.

उद्याच्या मेळाव्यात पहिल्यांदाच ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. महापालिका निवडणुकीत चित्र बदललेले दिसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगेल.

मनसेचे नेते श्री पाटील यांचं महिला आघाडीच्या सुजाता ढेरे, शहर प्रमुख सुदाम कोंबडे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार यांचं विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी जमले होते. कार्यकर्ते, नेत्यांनी घोषणा देत उद्याच्या सभेच्या पूर्वसंध्येला घोषणा देत एल्गार केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT