MNS Nashik News: कर्जमाफीच्या प्रश्नावरून नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. आता अन्य पक्षही या विषयावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आहे.
सोमवारचा दिवस नाशिक शहरात विविध आंदोलनांनी गाजला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कार्यकर्त्यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. कर्जमाफीची घोषणा न केल्यास सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी पक्षाचे नेते सलीम शेख, ॲड रतन कुमार इचम, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवसात विविध प्रश्नांवर मनसे नाशिक शहरात आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
यावेळी भर पावसात मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा तातडीचा आणि प्राधान्याचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर चालढकल करू नये, असा इशारा देण्यात आला.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत आहे. बँकेपुढे कर्ज वसुलीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाचविण्यासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात महायुती सरकार आणि जिल्ह्यातील मंत्र्यांमध्येच मत भिन्नता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेवर आपल्या पसंतीचा प्रशासक नियुक्त केला आहे. कर्जाच्या व्याजावर मोठी सवलत देखील जाहीर करण्यात आली आहे. तर त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
या स्थितीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव ठाकरे आणि आता मनसे कर्जमाफीच्या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. या आंदोलनांचा फटका कर्ज वसुलीवर होत आहे. या स्थितीत राज्य शासन कर्जमाफीच्या प्रश्नावर काय धोरण स्वीकारते, याची उत्सुकता आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाने कर्जमाफी तातडीने जाहीर करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्ती न केल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.