
Shivaji Kardile Prajakt Tanpure news : राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार शिवाजी कर्डिले अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात विकास कामांवरून श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.
माजी मंत्री तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी कर्डिले यांच्यावर तिखट मारा करत टिका केली.'विद्यमान लोकप्रतिनिधींना पाठीच्या त्रासाचा आजार आहे, मात्र भाषणातून त्यांचा स्मृतिभ्रंश झाल्याचा भास होतो,' अशी टिका तनपुरेंनी केली.
प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) म्हणाले, "राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, विद्यमान आमदारांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी आमच्याकडून कायमच शुभेच्छा आहेत. परंतु आमच्या माहितीनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींना पाठीच्या त्रासाचा आजार आहे, मात्र भाषणातून त्यांचा स्मृतिभ्रंश झाल्याचा भास होतो."
'नगर परिषदेत विकास कामे न केल्याचा आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, साडेतीन वर्षांपासून नगर परिषदेत प्रशासक म्हणजेच भाजपचेच राज आहे. तिथे कोणीही नगराध्यक्ष अथवा नगरसेवक नाहीत. आपल्या भाजप (BJP) सरकार काळात कोणताही निधी कोणत्याही कामासाठी मिळवून देण्यात अडचण आणणारे आमच्यावर आरोप करीत आहेत,' असा टोला तनपुरेंनी कर्डिलेंना लगावला.
एक वर्षापासून पूर्णवेळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. मुख्याधिकारी आणण्याऐवजी त्याच अधिकाऱ्यांना दमदाटी करून, त्यांची बदली करून घ्यायचा प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात आहे. काल झालेले विकास कामांचे उद्घाटनासाठी आमदाराला कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. नगरपरिषदेचा निधी मिळतच असतो. परंतु आता निवडणुका येऊ घातल्याने, मी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी उद्घाटनाचा आणि कामे केल्याचा फार्स सत्ताधारी आमदाराकडून केला जात आहे, असा घणाघात प्राजक्त तनपुरेंनी केला.
नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणारे काही इच्छुक जनतेला दाखवण्यासाठी स्वतःच टेप धरून रस्त्याची मोजमाप करताना दिसत आहेत. आपल्या कार्यकाळात नगराध्यक्षपद असतानाही भरपूर कामे करताना विधानसभेत मंत्रिपदी गेल्यानंतर कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. मात्र साडेतीन वर्षांपासून सरकारच्या माध्यमातून पालिकेवर सत्ता आहे, अधिकारी त्यांचेच आहेत, त्यांनी मात्र कोणतेही व्हिजन न ठेवून विकासकामे न करता केवळ पालिकेतील ठेके आपल्या बगलबच्च्यांना वाटण्याचे काम केले. राहुरी शहराच्या झालेल्या दुर्दशेला विद्यमान आमदार व त्यांचे सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप तनपुरेंनी केला.
लोकप्रतिनिधींनी शहरासाठी रस्ते व इतर कामांसाठी सरकारकडे भांडून पाठपुरावा करून निधी आणावा, आम्ही त्याचे स्वागतच करू. परंतु नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर फार मोठे काम मार्गी लावल्याचा आव आणू नये, असा टोला देखील माजी मंत्री तनपुरे यांनी आमदार कर्डिलेंना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.