Raj Thackeray & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: सत्ताधारी मंत्री, आमदारांना जमले नाही, त्याचा भार आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर, काय आहे प्रकरण?

Raj Thackrey; MNS chief Raj Thackeray will take the initiative to provide justice to tribal protesters-नाशिकच्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलकांनी मुंबईत राज ठाकरे यांच्याकडे मांडली कैफियत

Sampat Devgire

Tribal Agitation News: राज्यातील आदिवासी आश्रम शाळांतील कर्मचाऱ्यांनी नाशिकला बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. त्यांच्या प्रश्नावर आदिवासी विकास मंत्री लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे हे आंदोलक आदिवासी विकास भवन समोर रस्ता अडवून ठिय्या मांडून बसले आहेत. यावर मार्ग निघत नसल्याने सध्या तरी कोंडी झाली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी कंत्राटी कामगार नेमण्याची आडमुठी भूमिका घेतली आहे. सरकारला ५० कोटी रुपयांच्या आर्थिक खड्ड्यात घालणारी ही योजना आहे. मात्र सध्या कार्यरत असलेल्या आदिवासी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवण्यास नकार देण्यात आला आहे. आता त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

राज्यातील आश्रम शाळांतील १७९१ कर्मचारी यांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. दहा दिवसांपासून हे कर्मचारी नाशिकला विऱ्हाड मोर्चा घेऊन मुक्कामाला आले आहेत. मात्र प्रशासन त्यांना कोणताही प्रतिसाद द्यायला तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न चिघळला आहे.

यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचे नितीन पवार, हिरामण खोसकर यांसह काही आमदारांनी याकडे सरकारचे लक्ष नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार सत्ताधारी आहेत. मात्र या आमदारांनाही या आंदोलकांच्या प्रश्नावर लक्ष घालण्यास वेळ मिळालेला नाही. सरकारनेही त्यांच्याच पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांना जुमानले नाही. अशा स्थितीत सरकारची भूमिका वादाचा विषय बनली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांनाच न जुमणाऱ्या सरकारची गाठ या प्रश्नावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी आहे. ५० आंदोलकांनी काल मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. वेळी त्यांनी आपले प्रश्न अतिशय सविस्तर मांडले. त्यानंतर राज ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत कायम ठेवावे या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलन पुन्हा नाशिकला परतले आहे.

विधिमंडळात सत्ताधारी महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. मात्र रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे विधान राज ठाकरे यांनी दोन आठवड्यापूर्वी केले होते. या पार्श्वभूमीवर सरकार सत्ताधाऱ्यांनाही जुमानत नसल्याने राज ठाकरे यांच्या दरबारात आंदोलकांनी कैफियत मांडली आहे. आता राज ठाकरे जे आदिवासी आमदार आणि मंत्र्यांना जमले नाही ते करून दाखवणार का? याची उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT