MNS Agitation at Ramkund Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: महापालिकेला कडक इशारा...गोदावरी प्रदूषणाविरोधात मनसेच्या नेत्यांनी घेतल्या रामकुंडात उड्या!

Raj Thackrey; MNS followers agitation at Ramkund to stop Godavari Pollution in Nashik-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे गोदावरी प्रदूषणाविरोधात जोरदार आंदोलन

Sampat Devgire

Nashik MNS News: नद्यांचे प्रदूषण हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चर्चेत आणलेला मुद्दा आहे. त्यावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. गोदावरी प्रदूषणाविरोधात महापालिकेला जोरदार इशारा देण्यात आला.

मनसेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज गोदावरी रामकुंडावत आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात उड्या घेत महापालिका आणि शासनाचा जोरदार निषेध केला. महापालिकेने याबाबत तातडीने पावले टाकावेत अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

पक्षाचे प्रदेश सचिव दिनकर पाटील, महानगरप्रमुख सुदाम कोंबडे, अंकुश पवार, माजी नगरसेविका सुजाता ढेरे, सलीम शेख यांचं विविध पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रशासनाला इशारा दिला.पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन झाले.

मनसेने गोदावरी प्रदूषण विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले होते. दोन दिवसांपासून नदीपात्रातील पानवेली काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गोदावरी प्रदूषित करणाऱ्या सांडपाण्याच्या प्रवाहांबाबत फारसी हालचाल झालेली नाही.

दोन वर्षांनी नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे या निमित्ताने लक्षावधी भाविक नाशिकला येतात. नाशिकला रामकुंडात आणि गोदावरी नदीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्नानाला भाविक येतात. त्यामुळे गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते.

मुंबईत शिवाजी पार्कला झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि नद्यांचे प्रदूषण या विषयाला हात घातला होता. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण तातडीने रोखण्यात यावे. यासाठी मनसेने आक्रमक होत प्रशासनाला इशारा दिला. त्या दृष्टीने आज रामकुंडात उड्या घेत पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. प्रदूषण मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी पक्षाचे सचिव पाटील यांनी दिला.

नाशिक शहरात गोदावरी प्रदूषणावर मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे दिल्या अनेक वर्ष महापालिकेसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची कोंडी होण्याची शक्यताआहे. या आंदोलनामुळे अन्य राजकीय पक्षांनीही जास्ती घेतली आहे. पुढच्या टप्प्यात मनसे काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT