Uddhav Thackeray politics: स्वबळावर की महाविकास आघाडी?...उद्धव ठाकरे देणार पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

Uddhav Thackrey; Confusion in Uddhav Thackeray's party regarding upcoming elections-आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत होणार विचार मंथन
Uddhav-Thackeray.jpg
Uddhav-Thackeray.jpgSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. धक्क्यातून घटक पक्ष अद्यापही सावरलेले नाहीत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात महाविकास आघाडी बाबत स्पष्ट संकेत नाहीत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे येत्या १६ एप्रिलला नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन होणार आहे. या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना निमंत्रण दिले आहे. नाशिकच्या शिवसेनेत भाकरी फिरविल्यानंतर पहिल्यांदाच हे शक्ती प्रदर्शन होत आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळ्यांनाच या कार्यक्रमाविषयी उत्सुकता आहे.

Uddhav-Thackeray.jpg
Kirit Somaiya Politics: धक्कादायक...मालेगाव आणि पश्चिम बंगालमध्ये आहे हे कनेक्शन!

विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष बांधणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबई बाहेर विविध ठिकाणी पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मेळावे होत आहेत. त्या दृष्टीने नाशिकच्या मेळाव्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील.

Uddhav-Thackeray.jpg
Devendra Fadnavis District Bank: मुख्यमंत्री फडणवीस, कृषिमंत्री कोकाटे यांच्या जिल्हा बँकांना सहकार आयुक्तांनी दिली शेवटची संधी!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच यासंदर्भात नाशिकला दौरा केला होता. या दौऱ्यात आगामी शिवसेना मेळाव्यासाठी चर्चा करण्यात आली उपनेते सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख विलास शिंदे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, यांस विविध पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कंबर कसली आहे. यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. त्या विरोधात टिकून राहण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे.

आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निवडणुकांना सामोरे जाईल की स्वबळावर निवडणुका करणार याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. संदर्भात टोकाचे मतप्रवाह आहेत. दृष्टीने पक्षप्रमुख ठाकरे नाशिकच्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत देण्याची शक्यता आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेत आहे. त्या माध्यमातून शिवसेना ठाकरे पक्षाला खिळखिळे करण्याचा त्यांचा डाव आहे. मुबलक साधन आणि सुबत्तेचा उपयोग केला जात आहे. त्या दृष्टीने निवडणुकी संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाचा नाशिकचा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

--------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com