MNS Agitation at Nashik Ajit Pawar & Raj Thackerey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: मनसे आक्रमक, शेतकरी कर्जमाफीसाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच डिवचले!

Raj Thackrey; The government will not be allowed to sit idly by without getting a loan waiver-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप.

Sampat Devgire

MNS Agitation News: शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न विरोधकांनी उचलून धरला आहे. यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. आक्रमक झालेल्या मनसेने जिल्हाभर आंदोलन केले. शेतकरी कर्जमाफीचे हे आोदलन चर्चेचा विषय आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे मेळावा झाला होता. गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचा संदेश देण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यात राज ठाकरे यांचा हा संदेश पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यासाठी शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न हाती घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र सत्तेवर येताच सरकारला त्याचा विसर पडला आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

या विरोधात आक्रमक झालेल्या मनसेच्या नेत्यांनी नाशिक शहरात पक्षाचे सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. गाजर दाखवत सरकार विरोधात घोषणा देत झालेल्या आंदोलनाला मोठी गर्दी होती. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे पालन न झाल्यास सरकारला स्वस्त बसू दिले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

गेले काही दिवस मनसे संघटनात्मक स्तरावर मरगळलेला होता. आता मात्र पक्षाने आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे. अन्य विरोधी पक्ष स्वस्थ बसले असताना मनसेची आक्रमकता चर्चेचा विषय आहे.

नाशिक शहरासह येवला दिंडोरी आणि विविध ठिकाणी मनसेने आंदोलन केले. प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हा अध्यक्ष रतन कुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांसह विविध पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

_____

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT