Girish Mahajan & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: मनसेचे दिनकर पाटील यांचा भाजपवर हल्ला, ठाकरे एकत्र आल्याने भाजपचे महापालिकेतील सत्तेचे स्वप्न भंगणार

Raj Thackrey;MNS General Secretary challenges BJP, when will Dawood Ibrahim enter?-उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने भाजप नेत्यांनी भ्रष्ट नेत्यांना एकत्र करूनही काहीही उपयोग होणार नाही.

Sampat Devgire

Dinkar Patil News: मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आज भाजपवर गंभीर आरोप केले. सत्तेच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याचे काम भाजप करीत आहे. त्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने हा चपराक बसेल असा दावा त्यांनी केला.

मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भाजप हा सत्तेच्या माध्यमातून जनतेचा छळ करणारा पक्ष आहे. या पक्षाला सत्तेची मस्ती आली असून त्या सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. लोकांच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणेघेणे नाही. राज ठाकरे यांचा मेळावा त्याला उत्तर असेल.

भाजप पक्षाकडून मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपींशी संबंधित नेत्यांना आणि अन्य गुन्हेगारांना प्रवेश देत आहे. हे आरोप भाजपने स्वतःच केले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याची या पक्षाची तयारी आहे. सत्तेसाठी त्यांनी काहीच करायचे शिल्लक ठेवलेले नाही.

भारतीय जनता पक्ष सातत्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना छळण्याचे काम करीत आले आहे. सत्ता आणि सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेलिंग हा पक्ष करतो. या पक्षात प्रवेश केल्याबरोबर गुन्हेगारही स्वच्छ चारित्र्याचे होतात. याबाबत आता जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या या कार्यपद्धतीबाबत भाजपचे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्तेच अस्वस्थ झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत नाशिकची जनता या पक्षाला त्याची जागा दाखवील. भाजपची सध्या भ्रष्टाचार, गैरकारभार, गुंडगिरी आणि हुकूमशाही सुरू आहे. तिला नाशिकचे मतदार उत्तर देतील.

भाजपला रोखण्यासाठी भक्कम विरोधक गरजेचा आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे असे मनापासून वाटते आहे. त्याची सुरुवात आता झाली आहे. महायुतीचे सरकार त्यामुळेच चार पावले मागे जात त्यांनी आपला राजकीय डाव मागे घेतला आहे, अशी टीका मनसे सरचिटणीस पाटील यांनी केली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT