Raj Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टची महापालिकेने केली दुरावस्था

बॉटनीकल गार्डनची दुरावस्था झाल्याने माजी महापौरांची नाराजी

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या संकल्पनेतून शहरात (Nashik) बॉटनीकल गार्डन (Botanical Garden) उभारण्यात आले. त्यासाठी उद्योगपती रतन टाटा (Industrialist Ratan Tata) यांनी सामाजिक दायित्व निधी (CSR) दिला होता. महापालिकेचा एक पैसाही खर्च न होता एक चांगला प्रकल्प उभा राहिला. मात्र सध्या महापालिकेच्या (NMC) उदासीनतेमुळे त्याची दुरावस्था झाली आहे. ती तात्काळ थांबवा असा इशारा माजी महापौर, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांनी दिला आहे. (NMC ignore care of Botanical garden of Nashik)

राज ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यासाठी त्यांनी व्यक्तीश: लक्ष घातले होते. त्यातून एक चागंला व शहरवासीयांच्या पसंतीला आलेला एक उत्तम प्रकल्प होता.

यासंदर्भात श्री. मुर्तडक म्हणाले, नाशिककरांच्या करातील एकही पैसा न वापरता उद्योगपती टाटा यांच्या सीएसआर निधीतून साकारलेल्या व अनेकविध वैशीष्ट्यांमुळे अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरलेल्या पंडीत. जवाहरलाल नेहरू बॉटनीकल गार्डनची अवस्था प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे बिकट झाली आहे.

आज हे बॉटनीकल गार्डन गुन्हेगारांचा, टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. या टवाळखोरांकडून येथील सुरक्षा रक्षकांनाही दमदाटी केली जाते. आता तर या गार्डनमध्ये चोरीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथे कायम स्वरूपी पोलिसांची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे. या अगोदर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयी निवेदन दिले होते. मात्र प्रशासनातर्फे याबाबत गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याबाबत गांभिर्याने लक्ष घालावे. तात्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच येथे कायम स्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून नाशिककरांना दिलासा द्यावा अशी मागणी `मनसे`तर्फे करण्यात आली.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, स्थायी समिती सदस्य सलिम (मामा) शेख, शहर समन्वयक सचिन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष जावेद शेख, निकीतेश धाकराव, नितीन माळी, सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष राकेश परदेशी आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT