Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Vaje Politics: विमानसेवेचा प्रश्न; खासदार वाजे यांनी नाशिककरांवर टाकली `ही` जबाबदारी?

Sampat Devgire

Rajabhau Vaje News: लोकसभा निवडणुकीत नाशिकला विमानसेवा हा महत्त्वाचा प्रश्न असतो. या संदर्भात आता एक पाऊल पुढे पडले आहे. त्यामुळे नाशिकचे विमानसेवा आता चर्चेचा विषय ठरली आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गेले काही दिवस सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. नाशिक येथून सुरू असलेली देशांतर्गत विमान सेवेचा विस्तार केला जाणार आहे.

येथून सुरू असलेल्या कोणत्याही विमान सेवा बंद केल्या जाणार नाहीत. मात्र त्यात विस्तार करण्याचा केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक येथील कोणतेही उड्डाण बंद केले जाणार नाही. मात्र आगामी काळात नाशिक येथून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकत्ता, लखनऊ, नागपूर आणि गोवा या शहरांसाठी दोन विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीला होकार मिळाला आहे.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार वाजे यांनी राज्यमंत्री मोहोळ यांच्याशी चर्चा केली. नाशिक येथून सध्या सुरू असलेल्या विमानसेवा नफ्यात आहेत. प्रवासी त्याचा उपयोग करीत आहेत. कंपन्यांनाही चांगला प्रतिसाद आहे.

त्यामुळे येथील विमानसेवेचा विस्तार विस्तार करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या पाठपुराव्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने नाशिकच्या ओझर विमानतळावरील विमानसेवा आणि त्याचे नफ्याचे प्रमाण याचा विचार करून लवकरच आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि उद्योजकांना प्रदेशात आपल्या माल पाठविण्यासाठी देखील हवाई मार्गाचा उपयोग होऊ शकणार आहे. या संदर्भात लवकरच कार्गो विमानसेवा देखील सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार वाजे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

जुलै आणि ऑगस्टमध्ये नाशिक येथून विमान सेवा बंद करण्याचा विचार सुरू होता. त्यावर नागरिकांनी नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे खासदार वाजे यांनी नागरी उड्डाण विभागाकडे प्रयत्न केले. त्याला चांगल्या प्रकारे यश आले आहे.

या निर्णयामुळे व्यवसाय, उद्योजकता, पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळेल. नाशिक येथून नागरिकांना परदेशी सफर देखील करणे शक्य होईल. कनेक्टिंग फ्लाइट्समुळे ही सेवा सुरू होण्यास मदत मिळेल. कनेक्टिंग फ्लाईट चा उपयोग प्रवाशांबरोबर अन्य यंत्रणा नाही होईल.

खासदार वाजे यांच्या प्रयत्नाने नाशिक येथील आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र यामध्ये नाशिककरांवर मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. विमान कंपन्यांनी पुरेसे प्रवासी मिळत नाहीत.

येथील सेवा आर्थिक तोट्यात आहे, असे कारण देत सध्या सुरू असलेल्या सेवा देखील बंद करण्याचा विचार सुरू केला होता. अशा स्थितीत नाशिक विमानतळावरील प्रवासी संख्या वाढणे, हे त्याला उत्तर असेल. नाशिकहून हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली, तरच हे स्वप्न जमिनीवर येईल. अन्यथा हे हवेतले इमले ठरू शकतात. त्यामुळे खासदार वाजे यांनी केलेल्या प्रयत्नांना नाशिककरांनी प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद देण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT