Sudhakar Badgujar & Vasant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vasant Gite politics: शिवसेनेसाठी काँग्रेसने कंबर कसली; मात्र इच्छुक उमेदवारांची अनुपस्थिती खटकली!

Rajabhau Waje; each and every seat is important for formation of government-नाशिक शहरातील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी बाजूला ठेवत प्रचाराला सुरुवात केली.

Sampat Devgire

Congress News: महाविकास आघाडीची बैठक आज शहरात झाली. काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी बाजूला ठेवीत कामाला सुरुवात केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रचाराला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

शहरातील नाशिक मध्य मतदार संघावर काँग्रेस पक्षाने दावा केला होता. या पक्षाकडे विविध इच्छुक उमेदवार होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली होती. मात्र हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आला.

मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडल्याने काँग्रेसच्या इच्छुकांची नाराजी वाढली. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागली होती. विशेषतः माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांना माघार घेण्यासाठी पक्षाच्या अनेक नेत्यांना फोन करावे लागले होते.

माघारीच्या दिवशी काँग्रेसच्या सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील बंडखोरी टळली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. त्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनावर नेत्यांनी मार्गदर्शन केले.

आज या संदर्भात प्रचाराच्या नियोजनासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे, माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर अॅड यतीन वाघ, दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक समीर कांबळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे, शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे, शाहू खैरे, स्वप्नील पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांसह उमेदवार माजी आमदार वसंत गीते (मध्य) आणि सुधाकर बडगुजर (पश्चिम) हे उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात जागा न मिळाल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक नाराज होते. मतदारसंघ मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. त्यात यश आले नाही. त्यामुळे आता ही नाराजी बाजूला ठेवून आम्ही सर्व मनापासून प्रचारात सहभागी होणार आहोत, अशी भावना व्यक्त केली.

शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक आणि इच्छुक श्री. दिवे यांनी काँग्रेसने निवडणुकीची तयारी केली होती. तीसर्व यंत्रणा महाविकास आघाडीचे काम करेन, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे खासदार वाजे यांनी राज्यात आगामी सरकार महाविकास आघाडीचे यावे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी एक एक मतदारसंघ आणि प्रत्येक आमदार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केली पाहिजे.

राज्यात सरकार स्थापन झाल्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निश्चितच प्रतिष्ठा मिळेल. राज्यातील जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी काम करता येईल. महायुती सरकारने समाजात लावलेली भांडणे दूर होतील. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी राज्यात नवीन सरकार स्थापन करणे हे आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वांनी मनापासून कामाला लागावे, असे आवाहन खासदार वाजे यांनी केले. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेस पक्षाच्या इच्छुक डॉ हेमलता पाटील, गुलजार कोकणी आणि हनीफ बशीर यांनी मात्र पाठ फिरविली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे या उमेदवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. इच्छुकांची अनुपस्थिती काही वेगळे संकेत देण्यासाठी तर नव्हती ना, असे बोलले जाते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT