PM Narendra Modi: काँग्रेसच्या कार्यकाळात देशात दोन संविधान; जम्मू-काश्मीरमधील 'कलम 370'च्या ठरावावरून PM मोदींचा संताप

PM Narendra Modi Warning to Congress and MVA: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील सभेतून काँग्रेस आणि महाविकास आघाडीला इशारा.
Narendra Modi | Rahul Gandhi
Narendra Modi | Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi in Dhule: "पाकिस्तानचा अजेंड्याला देशात राबणाऱ्यांना इशारा देताच, जम्मू-काश्मीरमध्ये जगातील कोणतीही ताकद कलम 370 लागू करू शकत नाही. तसंच काँग्रेसच्या कार्यकाळात देशात दोन संविधान चालायची.

आता फक्त बाबासाहेबांचे संविधान चालणार, असे सांगून जम्मू-काश्मीरमधून बाबासाहेबांचे संविधान हटवून तिथं पुन्हा घुसू न देण्याच डाव काँग्रेसचा आहे", असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धुळे इथं तब्बल 49 मिनिटं घणाघाती भाषण केले. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसलाच (Congress) टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर होते. यावेळी विधानसभा निवडणुकीला पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस आहे. काँग्रेसच्या संविधानी विचारधारेचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला होता.

विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस संविधान आणि जाती जनगणना या मुद्यांवर भर देणार आहे. हे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचार सभेत केला. पंतप्रधान मोदी यांनी संविधानाची मुद्दा जम्मू-काश्मीरशी जोडत काँग्रेसच्या सत्ता काळात देशात दोन संविधान चालायाचे, असा घणाघात केला.

Narendra Modi | Rahul Gandhi
PM Narendra Modi : मोदी महायुतीच्या सत्तेसाठी आक्रमक; काँग्रेस, नेहरू, गांधी परिवाराच्या जातीच्या राजकारणावर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, "काँग्रेसने काश्मीरमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान 75 वर्षांपर्यंत लागू होऊ दिले नाही, याचे उत्तर काँग्रेसला द्यावा लागेल. काँग्रेस एवढे वर्ष सत्तेत होता. परिवार सत्तेत होता. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान का लागू होऊ दिले नाही, याचे कारण सांगावी लागतील.

देशात त्यावेळी दोन संविधान होते. आता मोदी आल्यानंतर बाबासाहेबांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू झाले आहे". काँग्रेस दहशतवाद, नक्षलवादाला संरक्षण दिले. ज्या समस्या काँग्रेस निर्माण केल्या होत्या, त्या आम्ही कलम 370 हटवून संपवल्या. हा आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा निर्णय असल्याचा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.

Narendra Modi | Rahul Gandhi
Latur Assembly Constituency: महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा अधिक यश मिळणार!

काश्मीरला तोडण्याचा कारनामा...

"काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवल्याबरोबर पुन्हा कटकारस्थानं सुरू झाली आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेतील गदारोळ करत जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. देश हा निर्णय स्वीकार करेल का?, असा प्रश्न करत काश्मीरला तोडण्याचा हा कारनामा तुम्हाला हवा आहे का?", असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभास्थळी असलेल्यांना केला.

विधानसभेत कलम 370 बॅनर झळकवले. भाजप आमदरांनी विरोध केल्यावर त्यांना उचलून विधानसभेतून बाहेर काढले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला खरा चेहरा देशाला आणि महाराष्ट्राने समजावून घेतला पाहिजे. कलम 370 लावून पुन्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हटवायचे आहे. मोदी जे संविधान तिथं घेऊन गेले होते. तिथे पुन्हा कलम 370 लागू झाल्यास तिथं संविधानाला जागा नसेल, असा दावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पाकिस्तानचा अजेंडा

"काँग्रेस आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात संविधानाची खोटे पुस्तक दाखवत आहेत. हे झळकवणारे पुस्तक कोरे आहे. 'कोरे कागजवालों का, कटी पतंग का जमाना आला आहे'", असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. दलितांच्या अधिकाऱ्यांवर बोलताना काँग्रेस त्यांना फसवत आहे. गुमराह करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतर बाबासाहेब यांचे संविधान लागू होत आहे. परंतु काँग्रेस तिथं गरिबांचे अधिकार हिसकावून घेण्याचे काम करत आहे.

महाराष्ट्रात देखील दलितांच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे. खोटं पेरलं जात आहे, असे सांगून पाकिस्तानचा अजेंडा देशात पेरू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मोदीवर जनतेचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान चालणार आणि हा मोदीचा 'फैसला है', असे सांगून जगातील कोणतीही ताकद जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com