Rajabhau Waje on Nashik Pune railway route Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje : नाशिक-पुणे रेल्वे मार्गात लोकभावनेचा विचार न झाल्यास आंदोलन अटळ? खासदार वाजे यांचा सरकारला पुन्हा इशारा

Rajabhau Waje on Nashik Pune Railway issue: All-party leaders are aggressive -नाशिक पुणे रेल्वे प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेत दिला केंद्राला इशारा, ९ ऑगष्टला होणार आंदोलन?

Sampat Devgire

Nashik Pune Railway News: नाशिक पुणे रेल्वे मार्ग मागणीसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले. यासंदर्भात झालेल्या बैठकीला सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. आता या प्रश्नावर केंद्र सरकार विरोधक रोष वाढू लागला आहे. यासंदर्भात ९ ऑगष्टला सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बहुजन शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने नाशिक रोडला सर्वपक्षीय बैठक झाली. नाशिक पुणे रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. मात्र या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयात काही सत्ताधारी पक्षांनी राजकारण आणल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे, भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांसह विविध पक्षाच्या नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक आणि पुणे विकासासाठी या मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासह विविध कामांवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाला आहे. सध्या मात्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटल्या आहे. या परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवावे अशी मागणी करण्यात आली.

या संदर्भात संसच्या आगामी अधिवेशनात सर्वपक्ष नेत्यांची शिस्त मंडळ रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहे. या प्रकल्पाचे महत्त्व आणि स्थानिक नागरिकांच्या भावना रेल्वेमंत्र्यांना कळविण्यात येते. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर आणि चाकण मार्गेच झाला पाहिजे. नाशिक पुणे मुंबई सुवर्ण त्रिकोण आणि या भागातील औद्योगिक विकासाचा विचार करतात या रेल्वेची आवश्यकता आहे. तीस वर्षांपूर्वी या मार्गाचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाला मान्यता मिळाली होती.

यावर शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी जमिनी देण्यासही तयारी दाखविली आहे. सध्या मात्र सत्ताधारी पक्षाचे काही मंत्र्यांनी त्यात राजकारण आणले आहे. कोणतीही मागणी नसताना शिर्डी आणि नगर मार्गे रेल्वे करण्याचा विषय पुढे आला आहे. हा पर्याय व्यवहार्य नाही असे ठाम मत विविध पक्षाच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT