NMC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress politics: काँग्रेसने महापालिकेला ठणकावले, कारवाई करा अन्यथा....

Rajendra Bagul wants Nashik Municipal corporation administration on miss management of water: धरणात पाण्याचा ठणठणात असताना शहरातील रस्त्यावर वाहत आहेत पाण्याचे पाट

Sudesh Mitkar

Nashik News: नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal corporation ) प्रशासकीय कामकाजावर काँग्रेसने नेमके बोट ठेवले आहे. प्रशासनाचा सावळा गोंधळ आणि संशयास्पद कारभार यामुळे चर्चेत आला आहे.

सध्या नाशिक शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर नुकत्याच केलेल्या काँक्रीट आणि डांबरीकरणाच्या स्मार्ट रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची आणि नागरिकांची मोठी गैरसोय होते. या खोदकामांमध्ये वेगळाच घोटाळा असल्याचे पुढे आले आहे. याबाबत काँग्रेस नेते राजेंद्र बागुल (Rajendra Bagul) यांनी नेमके बोट ठेवत प्रशासनाला अडचणीत आणले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या पाण्याचा ठणठणात आहे. त्यामुळे शहरात पाणी कपात करावी लागली आहे. मात्र दुसरीकडे शहरातील व पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीत शिकाऊ लोकांकडून कामे केली जात आहेत. त्यामुळे लोकांना पाणी मिळत नसले तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मात्र पाण्याचे पाट वाहत आहेत.

यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक बागुल यांनी महापालिका प्रशासनाच्या त्रुटी आणि संशयास्पद कारभारावर नेमके बोट ठेवले आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आले आहेत. मात्र प्रशासन त्याची दखल घेत नाही. प्रशासकीय राजवटीत या निष्क्रिय कामांमध्ये काय घोटाळा आणि अनियमितता आहे, हे त्यांनी उघड केले आहे.

बागुल यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर सातत्याने छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल केले आहेत. आज त्यांनी मध्यरात्री रस्त्यांवर वाहत असलेल्या पाण्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. अत्यंत निकृष्ट काम आणि त्यावर होणाऱ्या खर्च यापेक्षाही ऐन उन्हाळ्यात रात्रभर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. हा पाण्याबरोबरच महापालिकेच्या पैशांचाही अपव्यय आहे.  यावर तातडीने दोशींवर कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत आहेत.  त्यामुळे काँग्रेसचे हे पाणी बाणी आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT