Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा 'लोकमान्य टिळक' पुरस्काराने गाजत असला; तरी त्यावरून राजकीय वर्तुळात धुराळा उडत आहे. लोकसभा निवडणुकांचा अवधी जेमतेम नऊ-दहा महिन्यांचा बाकी राहिल्याने मोदींच्या या दौऱ्याला राजकीय रंगही लावला जात आहे. अशात मोदींच्या दौऱ्याची सुरूवात नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीने होणार असून, त्यामुळे पुढच्या साऱ्याच निवडणुकांमध्ये मोदींना 'बाप्पा' पावणार का असा सवालही विचारला जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच भाजपला कसब्याच्या निवडणुकीत दणका बसला होता. याआधी मोदी काहीवेळा पुण्यात आले, पण ते पहिल्यांदाच 'दगडूशेठ'च्या दर्शनाला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेच्या २०२४ निवडणुकीसाठी भाजप(BJP) नेत्यांनी कंबर कसली आहे. पुण्यातील ताकद कायम ठेवतानाच ती वाढविण्याचा या पक्षाच्या नेतृत्वाचा प्रयत्न आहे. महापालिका, लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होतील. विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपला दोन जागांवर हार मानावी लागली.
त्यात आठपैकी सहाच आमदार निवडून आले, त्यानंतर पोटनिवडणुकीत कसब्याची हक्काची जागा काँग्रेसने हिरावली. बदललेल्या राजकारणाने भाजपला पुण्यातही विरोधकांचे उरलेसुरले आव्हान मोडीत काढायचे आहे. त्याकरिता भाजपची टीम काम करत आहे. त्यात लोकसभेच्या निवडणुकाजवळ आल्याने भाजप नेतृत्वाचे दौरे वाढणार आहेत.
त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi) दौरा पुणेकरांना भुरळ घालतो. हा मूळ दौरा राजकीय किंवा पक्षाच्या कार्यक्रमांसाठी नाही. एका संस्थेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) उपस्थित राहणार असल्याने राजकीय वळण घेतले आहे. मोदी येणार असल्याने पुणे भाजपने सबंध शहर सजवून मोदींच्या या दौऱ्याला काहीसा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मोदींच्या करिष्म्यामुळे २०१४ ला पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत लोकसभेला खासदार, विधानसभेला भाजपचे आठही आमदारही दणदणीत मताधिक्यांनी निवडून आले होते. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसह जिल्ह्यातही भाजपने आपला चांगलाच जम बसवला आहे.
याचमुळे मोदींचा हा पुणे दौरा आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याचमुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा भाजपसाठी बूस्टर ठरू शकतो.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.