Raju Shetti
Raju Shetti  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raju Shetti Politics : राजू शेट्टी आता उडवणार नगरच्या नेत्यांची झोप ?

Sampat Devgire

Maharashtra Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता आपला मोर्चा नाशिक आणि नगरकडे वळविला आहे. येत्या मंगळवारी ते दूध उत्पादकांसाठी एल्गार पुकारणार आहेत. त्यांच्या या घोषणेने नगरच्या बड्या नेत्यांची झोप उडणार आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येत्या मंगळवारी सिन्नरला वावी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दूध परिषद होत आहे. या परिषदेसाठी संघटनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. माजी खासदार राजू शेट्टी त्याआधी नगर जिल्ह्यात याच प्रश्नावर रस्ता रोको करतील.

राजू शेट्टी Raju Shetti यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार विरोधात लढा उभारण्याचा निर्धार शक्ती केला आहे. कृषी दिनाचे औचित्य साधून एक जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरू होत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मस्थळी पुसद यवतमाळ येथून हे अभियान सुरू होईल. शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या गाईच्या दुधाला किमान ४० रुपये प्रति लिटर दर मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना देऊ केलेल्या पाच रुपये अनुदानात वाढ करून ते सात रुपये करावे. पशुखाद्याच्या किमतीवर नियंत्रण आणावे. यांसह विविध प्रश्नांवर खासदार शेट्टी आंदोलन करणार आहेत.

सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या नेत्यांची चलती असलेल्या नगर येथे शेट्टी आंदोलन करतील. याचवेळी दुष्काळी भाग असल्याने दूध उत्पादक शेतकरी असलेल्या सिन्नर येथे त्यांची परिषद होईल.

आगामी काळात राजू शेट्टी यांनी आपल्या लढा पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राकडेही वळविला आहे, असे दिसते. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचेच शेट्टी यांच्या दूध उत्पादक परिषदेकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT