Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंनी पटोलेंसमोरच काढली विलासराव देशमुख सरकारच्या काळातील उणीदुणी...

Maharashtra government new schemes : राज्य सरकारच्या घोषणेचे वाभाडे काढताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्याच्या समोरच त्यांच्या सरकारच्या काळातील वीज बिल माफीची उणीदुणी काढली. .
Sushilkumar Shinde, Uddhav Thackeray, Vilasrao deshmukh
Sushilkumar Shinde, Uddhav Thackeray, Vilasrao deshmukh Sarakarnama

Maharashtra government : राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. त्यासोबतच राज्यातील ⁠शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

या राज्य सरकारच्या घोषणेचे वाभाडे काढताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्याच्या समोरच विलासराव देशमुख सरकारच्या काळातील वीज बिल माफीची उणीदुणी काढली. (Uddhav Thackeray News)

राज्यात 1999 ते 2004 च्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी (Sushilkaumar Shinde) राज्यातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची घोषणा केली.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही काळ दिलासा मिळाला. मात्र, त्या नंतर 2004 साली दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. देशमुख सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची घोषणा बासनात गुंडाळत शेतकऱ्यांकडून माफ केलेले वीजबिल व थकबाकी वसूल केली, असा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत ठाकरेंनी केला.

त्यामुळे आगामी काळात या महायुती सरकारने त्याप्रमाणे केवळ शेतकऱ्याचे वीजबिल माफ करून थकबाकी वसूल करू नये, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी उदाहरणासोबत देत त्यावेळेसच्या सरकारने केलेल्या वीज बिल माफीच्या योजनेची पोलखोलच केली.

Sushilkumar Shinde, Uddhav Thackeray, Vilasrao deshmukh
Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी ठाकरेंनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे त्या मंत्रिमंडळात मंत्री होते, असे बोलताना ठाकरेंनी स्पष्टपणे सांगत. त्या सरकारप्रमाणे महायुतीच्या या सरकारने शेतकऱ्याचे वीजबिल माफ करून पुन्हा थकबाकी वसूल करण्याचा प्रकार करू नये, असे ठाकरे यांनी सुनावले.

शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणार का ?

शेतकऱ्यांना वीजबिल माफ करा, ही मागणी मी केली होती. ती त्यांनी माफ केली. पण शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा, ही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीजबिल माफ केल्यानंतर शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Sushilkumar Shinde, Uddhav Thackeray, Vilasrao deshmukh
Ajit Pawar Maharashtra Budget 2024: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना वीज बिल माफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com