Raksha Khadse Daughter Molestation News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबतच छेडछाड; जत्रेत काढला व्हिडिओ

Raksha Khadse Daughter Molestation: रक्षा खडसे यांच्या कन्येसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केली. त्यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा व्हिडिओ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mangesh Mahale

रावेर लोकसभेच्या खासदार, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी चार टवाळखोरांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. खडसे यांच्या कन्येसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केली. त्यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा व्हिडिओ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना पुन्हा आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कोथळीच्या जत्रेत हा प्रकार घडला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रक्षा खडसे यांनी आपल्या मुलीसह अन्य मुलींना घेऊन पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी होती. 'आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय," असा संतप्त सवाल रक्षा खडसे यांनी पोलिसांनी विचारला आहे.

रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत सुरक्षा रक्षक असतानाही हा प्रकार घडला आहे. टवाळखोर अद्यापही मोकाट असल्याचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

मुलींच्या छेडछाडीचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत.या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेन,” असे मत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.

अनेक घटनांची नोंद होत नाही. अशा घटनांसंदर्भात मुली समोर येत नाहीत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. या संदर्भात अनेक वेळा सरकारला म्हटलं की तुम्ही या विषयी बांगड्या घातल्या आहेत का? अशा घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळतंय, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT