MP Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse Politics : वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगावला मिळाले केंद्रात मंत्रीपद !

Jalgaon BJP politics, Jalgaon got ministry after 20 years to Raksha Khadse : रावेरच्या रक्षा खडसे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे

Sampat Devgire

Raksha Khadse News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ रविवारी संध्याकाळी होत आहे. यामध्ये जळगावच्या रक्षा खडसे यांचा समावेश आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राला देखील मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.

रावेरच्या खासदार खडसे यांचा मंत्रीपदाचा शपथविधी होत आहे. यानिमित्ताने राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांचा राजकीय वनवास दूर होत आहे. त्यामुळे जळगाव मध्ये भाजपकडून मोठ्या विजय उत्सवाची तयारी केली जात आहे. रक्षा खडसे आज मंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र त्यासाठी जळगावला तब्बल वीस वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे. यापूर्वी दहाव्या लोकसभेत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जळगावचे एम.के.अण्णा पाटील ग्रामविकास राज्यमंत्री होते. त्यांनी 2001 ते 2004 या कालावधीत हे खाते सांभाळले होते. त्यानंतर खडसे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळत आहे.

जळगाव हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातील बहुतांशी राजकीय सत्तास्थाने याच पक्षाच्या ताब्यात आहे. सध्या जळगाव मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असे तीन मंत्री आहेत. खडसे यांच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळतील. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविलेल्या विविध महिला उमेदवार मंत्रिमंडळासाठी दावेदार होत्या. यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), डॉ भारती पवार, डॉ. हिना गावित आणि नवनीत राणा या प्रमुख आहेत. या सर्व महिला निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. या संधीचा लाभ खडसे यांना मिळाला.

रविवारी सायंकाळी मोदी यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार सेलिब्रेशन ची तयारी केली आहे. या निमित्ताने खडसे समर्थक आणि विरोधक सर्वच राजकीय नेते एकत्र येण्याची संधी आहे. रावेर आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी महायुतीचे घटक पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी आतिषबाजी करणार आहेत. तर रावेर मध्ये रक्षा खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT