Rohini Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse Politics: नणंद रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का?, मंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्टच सांगितले...

Raksha Khadse; no campaign for Rohini Khadse, I am with mahayuti only-केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला

Sampat Devgire

Raksha Khadse News: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या राजकीय भूमिकेबाबत सातत्याने विचारणा होत असते. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत ननंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा प्रचार करणार का? याची चर्चा आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातून भारतीय जनता पक्षात जाण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती. त्या निवडणुकीत त्यांनी सून रक्षा खडसे हिचा प्रचार देखील केला. मात्र खडसे यांचा भाजप प्रवेश झाला की नाही? याविषयी स्पष्ट निर्वाळा होऊ शकलेला नाही.

या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात सक्रिय होत असल्याची घोषणा केली होती. त्यांची कन्या अॅड रोहिणी खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

सध्या श्री खडसे आपल्या कन्येच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांची सून म्हणून भाजप नेत्या, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रचाराची परतफेड करणार का? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

या संदर्भात राज्यमंत्री खडसे यांनी देखील आता स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी बांधील आहोत. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी मी सक्रिय आहे. कोणत्याही परिस्थितीत रोहिणी खडसे यांचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

आता या प्रश्नावर खडसे कुटुंबातील सदस्यांची राजकीय भूमिका स्पष्ट झाली आहे. राज्यमंत्री खडसे नाशिक येथे महायुतीच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी एकनाथ खढसे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत मी काहीही सांगू शकत नाही.

या संदर्भात जेष्ठ नेते खडसे हेच आपले मत व्यक्त करू शकतात. सध्या तरी भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश करण्याबाबत कोणताही विषय चर्चेत नाही.

श्री खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे माझा प्रचार केला होता. त्यात लपविण्यासारखे अथवा लपून ठेवण्यासारखे काहीही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे..

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT