Chalisgaon Assembly Election 2024: भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्याविरोधात चाळीसगाव मतदारसंघातून जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी दंड थोपटले आहे. ऐककाळचे चांगले मित्र असलेले हे मंगेश चव्हाण-उन्मेष पाटील यांच्या दोस्तीत कुस्ती रंगणार आहे. जळगाव जिल्ह्यातील लढतीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले माजी खासदार उन्मेष पाटील यांना आता पुन्हा आमदार व्हायचंय आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत उन्मेष पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.
लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदारांचे प्रगतीपुस्तक काढले होते. यात उन्मेष पाटील हे नापास झाले होते. आपल्या कामाविरोधात आमदार मंगेश चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती दिली होती, असा आरोप पाटील यांनी दिली होती.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात चाळीसगावची जागेसाठी (Chalisgaon Assembly Election 2024) उद्धवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत चांगलीच रस्सीखेच सुरु होती. शेवटी ही जागा ठाकरे सेनेच्या वाट्याला गेली आहे.चाळीसगावमधील दोन मित्रांमधील ही लढत जिल्ह्यातील सर्वांत 'हायव्होल्टेज' लढत मानली जात आहे.
उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमधील एक गट चव्हाणांच्या विरोधात असल्याचे बोलले जाते. त्याचा परिणाम चव्हाण यांच्या निवडणुकीवर होऊ शकतो, असे जाणकरांचे मत आहे. पण गेल्या पाच वर्षांत आमदार चव्हाण यांनी केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत मंगेश चव्हाणांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. पाणीपुरवठा, गावागावांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधा यावर चव्हाणांनी काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत केले आहे. मंगेश चव्हाण यांच्यावर जळगाव जिल्हा दूध संघातील कथित गैरव्यवहारांचे आरोप आहेत, हाच मुद्दांचा वापर विरोधक प्रचारात करीत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.