BJP Ram Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Ram Shinde : 'विखेंनी अजूनही उत्तर दिलेलं नाही, पण मी जे बोललो ते बोललो'; प्रा. राम शिंदे 'त्या' अनुभवावर ठाम! (VIDEO)

Sarkarnama exclusive interview Vidhan Parishad Speaker Ram Shinde BJP Minister Radhakrishna Vikhe Ahilyanagar : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पूर्वी केलेल्या विधानावर ठाम असल्याचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

Pradeep Pendhare

BJP internal conflict : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविषयीची असलेल्या राजकीय संघर्षाच्या अनुभवावरची खपली पुन्हा दोन वर्षांनी काढली. प्रा. राम शिंदेंनी काढलेल्या या खपलीमुळे विखेंविरुद्धच्या राजकीय संघर्षांची जखम पुन्हा ताजी झाली आहे.

'विखे ज्या पक्षात जातात, त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात', असा दोन वर्षांपूर्वी आलेल्या अनुभवावर प्रा. राम शिंदे आजही ठाम आहेत. 'मी हा अनुभव जाहीरपणे बोललो आहे. जे बोललो ते बोललो. पण त्यावर विखेंनी अजूनही उत्तरं दिलेलं नाही', याकडे प्रा. राम शिंदे यांनी लक्ष वेधलं.

'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीबरोबर अहिल्यानगरमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्याबरोबर असलेल्या राजकीय संघर्षावर भाष्य केले आहे.

मे 2023 मध्ये जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी विखे यांच्या राजकीय अनुभवावर मोठं विधान केलं होते. या विधानानं चांगलीच खळबळ उडाली होती. तब्बल दोन वर्षांनंतर देखील प्रा. राम शिंदे हे विखेंच्या त्या अनुभवावर ठाम आहेत.

प्रा. राम शिंदे म्हणाले, "पक्षाची, पक्ष नेतृत्वाची कार्यपद्धती असते. जी रूढ झालेली आहे. ती पूर्वीपार आहे. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये मला जो अनुभव आला, तो मी बोललो, त्याचे उत्तर त्यांनी दिलेलं देखील नाही. मी नाव घेऊन बोलतो, असे सांगितलं जातं. बोललो. जे बोललो ते बोललो". त्यांच्यासंदर्भात, हे काय या पक्षातील नाही, मागच्या पक्षातील देखील तेच बोलतात, असे देखील प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.

भाजपमध्ये बाहेरून आलेल्या पक्षातील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे लाड होतात, यावर बोलताना प्रा. राम शिंदे यांनी मला तसं काही वाटत नाही. पक्ष सातत्यानं बदलत राहणार. जनरेशन वाढत जाणार, भाजपचे ध्येय-धोरण असं आहे की, राष्ट्र प्रथम, पक्ष आणि त्यानंतर स्वतः, पण काँग्रेसचे याच्या उलटं आहे. यातून पिढ्यान् पिढ्या एकाच घरात राजकारण राहिल्यामुळे काँग्रेस संपुष्टात चालल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT