Ramdas Athawale News: मुघल बादशाह औरंगजेब यांची कबर गेले काही दिवस राजकीय विषय बनला आहे. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांनी या कबरीला विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात हा विषय चर्चेचा आहे. विशेषतः छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याची चर्चा झाली.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. औरंगजेब यांची कबर हटवावी अशी भूमिका घेणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपच्या नेत्यांना हा घरचा आहेर आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अचानक हा विषय राजकीय मुद्दा बनला. औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी विविध नेते करीत आहेत. त्याचे अजिबात समर्थन करता येणार नाही. त्याला विविध कारणे देखील आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याचा कोथळा बाहेर काढला त्या अफजलखानाची कबर देखील त्यांनीच बांधली. आजही ती कबर विशाळगडाच्या पायथ्याशी आहे. त्यातून काय संदेश मिळतो हे पाहिले पाहिजे. राजकारणासाठी राजकारण करणे योग्य नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे पावती म्हणून औरंगजेबाच्या कबरीकडे पाहिले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळे होते. त्यामुळे ही कबर हटविण्याची मागणी परिपक्वतेची वाटत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांचेही आठवले यांनी स्वागत केले. मोदी हे संविधान बदलणारे नसून संविधान न मानणाऱ्यांना बदलविणारे आहेत. त्यांनी आजवर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाची गरज होती. अल्पसंख्यांक समाजाचे हित साधले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.