Ramdas Athawale On Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale On Raj Thackeray : 'राज ठाकरेंच्या घरी जाऊच नका'; मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला देताच, मंत्री आठवलेंचं 'मनसे'च्या मान्यतेवर मोठं विधान

Union Minister Ramdas Athawale deregistration Raj Thackeray MNS Jalgaon : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जळगाव दौऱ्यावर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या मान्यता रद्दसाठी दाखल याचिकेवर मोठी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसंच उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडीवर आरपीआय पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पहिले म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाणे सोडावं, असे मंत्री आठवले यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँकांमधील मराठी भाषेच्या घेतलेल्या भूमिकेवर, आणि राज्यात हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची करत असलेल्या सक्तीवर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, "राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करू नये. मात्र आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत नाही. मुंबई (Mumbai) ही आर्थिक राजधानी आहे. अनेकांना सावरण्याचे काम मुंबईने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाणे सोडावं. एक तर जाऊच नये. ते दोन-तीनदा जाऊन आलेत". मुंबई बदनाम करून इकोनॉमी कमी करण्याचे काम आहे. ही भूमिका अयोग्य आहे, असेही मंत्री आठवले यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि मनसेने विकासाबद्दल बोलले पाहिजे. अशी दादागिरी करणे योग्य नाही, बँकांमध्ये अशा पद्धतीने मराठीचा आग्रह करणे चुकीचे आहे. राज ठाकरेंना देखील याबद्दल सद्बुद्धी देवो. अनावश्यक विषय समोर आणू नये. राज ठाकरे यांनी लोकसभेला पाठिंबा दिला. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असा देखील टोला मंत्री आठवले यांनी लगावला.

आमच्या पक्षाला एक विधान परिषद, एक मंत्रिपद मिळावे तसेच स्थानिक पातळीवर पक्षाच्या लोकांना स्थान द्यावे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागणीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत योग्य स्थान न मिळाल्यास, बंडखोरी करा, अशा सूचना मुंबईतील राज्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पूर्वीच दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT