Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale : रामदास आठवले हे काय बोलून गेले ; म्हणे, 'मी सोबत आहे तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील'

Ramdas Athawale On Narendra Modi : धुळ्यात रामदास आठवले यांची सभा झाली. या सभेत आठवले यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. त्यांनी या सभेत केलेलं एक विधान चर्चेचा विषय बनले आहे.

सरकरनामा ब्युरो

Indian political News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले आपल्या सभांमधून चारोळ्या करत असतात. यावेळी विधाने करताना अनेकदा गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. धुळे येथे त्यांनी केलेले असेच एक विधान चर्चेचा विषय आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शनिवारी धुळे शहराचा दौरा झाला.

शहरातील महाराणा प्रताप चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, राज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा झाली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत खोटे नेरेटीव्ह सेट केले होते. त्याचा फटका निवडणुकीत बसला.

आता मात्र विरोधकांना केंद्रात सत्तेत येण्याची कोणतीही संधी मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व समाजांचा पाठिंबा असलेले नेते आहेत. अतिशय चांगला कारभार करीत आहेत असे म्हटले.

राज्यमंत्री आठवले म्हणाले, मी संसदेत बसून चारोळ्या करतो. त्यामुळे आज माझे जगभरात फॅन तयार झाले आहेत. माझी लोकप्रियता सतत वाढत आहे, असे आपल्या नेहमीच्या शैलीत ते म्हणाले. मी ज्यांच्या सोबत असतो ते सत्तेत असतात. मी सोबत असलो की त्या पक्षाला शंभर टक्के सत्ता मिळते. हा आजवरचा पायंडा आहे. त्यात बदल होण्याची शक्यता अजिबात नाही.

जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत मी मंत्री असेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. भाजपला त्याची मदत होते. मी त्यांच्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील, असे धक्कादायक विधान आठवले यांनी केले.

लवकरच केंद्र सरकार देशात जातीनिहाय जनगणना करणार आहे. ही जनगणना झाली की कोणत्या जातीचे किती मतदार आहेत, हे स्पष्ट होईल. मराठा, मुस्लिम, ओबीसी आदी सर्व समाज आणि अल्पसंख्यांक हे आपल्याबरोबर आहेत असा दावा त्यांनी केला.

भारतीय संविधान सर्वसमावेशक आणि व्यापक हेतू असलेले आहे. मुळे भारताची स्थिती कधीही नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका या देशांसारखी होणार नाही. यावेळी भाजपचे माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आरपीआयचे नेते बाबुराव कदम, सुधाकर जाधव, वाल्मीक दामोदर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT