Saloon Association at collector office Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

प्रसिद्धीसाठी आक्षेपार्ह विधाने करण्यात रावसाहेब दानवे माहीर!

भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नाभिक समाजाची निदर्शने

Sampat Devgire

धुळे : सलून व्यावसायिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी धुळे (Dhule) शहर नाभिक समाजाने केली. मागणीसाठी जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना श्री. दानवे यांनी सलून व्यावसायिकांचा संदर्भ देत आक्षेपार्ह व बेजबाबदार वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सतत प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी दर वर्षी कुणाबद्दलही किंवा जातीबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात श्री. दानवे माहीर असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी. मंत्री दानवे समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत नाभिक समाजही शांत बसणार नाही, तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.

येत्या काळात समाजाची अशी हेटाळणी कुणी करीत असेल, तर त्याला त्याची जागा दाखविल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. आमच्या समाजाबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना कायमस्वरूपी वचक बसावा, संबंधितावर कारवाई होईल यादृष्टीने कायदा व्हावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी युवराज वारुडे, बापू अहिरे, राजेंद्र सोनवणे, प्रवीण सैंदाणे, नाना वारुडे, भीमराव वारुडे, धनराज पगारे, भालचंद्र चित्ते, राजेश महाले, विशाल चित्ते, बी. के. सूर्यवंशी, जितू बोरसे, गोपाल चित्ते, दिनेश महाले, राहुल सूर्यवंशी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT