Pankaja Munde, Mahadev Jankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahadev Jankar On Pankaja Munde : पंकजाताईंना साडीचोळी घेऊन त्यांना आणायला जाईन ! असं का म्हणाले महादेव जानकर ?

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmadnagar News : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी आता या मुद्द्यावर भाष्य करित पंकजाताईंसोबत आपण भक्कमपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केले. 'पंकजा या माझ्या भगिनी आहेत. त्यांना ( भाजप मध्ये) खूपच त्रास होत असेल, तर साडीचोळी घेऊन मी त्यांना आणायला जाईन,' असे सांगत जानकरांनी पंकजाताईंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पंकजाताई अस्वस्थ आहेत हे उघड-उघड दाखवून जानकरांनी भाजप नेत्यांनाही सोडले नाही.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या रासपात आल्या तर त्यांचे काय करायचे हे मी निश्चित करेल. पण सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यामुळे सध्या तरी मी त्यांना दिल्या घरी सुखी राहा असेच म्हणेल. मात्र, ज्यावेळेस त्यांना खूपच त्रास होईल तेव्हा मी साडीचोळी घेऊन बहिणीला आणायला जाईल, असे मत जानकर यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस,भाजपपासून (BJP) सावध व्हा आणि प्रादेशिक पक्षाला आपलेसे करा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रादेशिक पक्षांबाबत बोलतांना

प्रादेशिक पक्ष जेवढे चांगले काम करतात. तेवढे मोठे पक्ष काम करत नाहीत. दिल्ली, तेलंगणा राज्यात शेतकरी व जनतेला अनेक सोयीसुविधा मिळतात. मात्र, येथील शेतकऱ्यांच्या पोरांना आम्ही मंत्री असूनही, काही देवु शकत नाही. आमचे हात बांधले आहेत. प्रादेशिक पक्षाला ग्रामीण जनतेचे प्रश्र माहित असतात. मोठ्या पक्षांना असे काही माहिती नसते. ते न्याय देवु शकत नाहीत. प्रादेशिक पक्षांची सत्ता आल्यानंतर विकास होवू शकतो असा विश्वास, जानकर यांनी व्यक्त केला आहे.

जनसंवाद यात्रा

राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आमदार महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात 'जनसंवाद यात्रा' काढण्यात येत आहे. जानकर यांनी 2024 ला लोकसभेसाठी 543 मतदारसंघात रासपचे उमेदवार रिंगणात असतील अशी घोषणा केली. 'मी माझ्या कार्याला चोंडीतून सूरूवात केली. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सभा घेतल्या. मुंबईला देखील जयंती साजरी केली. आता दिल्लीत जयंती साजरी करत आहोत. दिल्लीत १० लाख लोक गोळा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवस रासपचा पंतप्रधान चोंडीला येणार असल्याचा महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे'.

धनगर आरक्षण

धनगर आरक्षणासाठी जानकर म्हणाले, आदिवासी आयोगाचा धनगर आरक्षणाला विरोध आहे. काँग्रेस,भाजपातील आदिवासी समाजाचे खासदार, आमदार धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत. मात्र, भविष्यात रासपाचे १०० खासदार निवडून गेल्यास धनगर आरक्षणाबरोबरच मराठा, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्र सोडवता येईल.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT