Jalgaon: रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे (Raver Lok Sabha Constituency 2024) उद्योगपती श्रीराम पाटील (Shriram Patil) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तब्बल सहा तास चर्चा झाल्यानंतर श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी उद्योजक होण्यापर्यंत भरारी घेतली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी तयारी दाखवली होती.
पक्षाच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.
श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन ही त्यांची कंपनी आहे. सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलरचे उत्पादक आहेत, श्रीराम फाउंडेशन रावेरचे ते अधक्ष आहेत. मराठा समाज भूषण, उद्योग भूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.