Ravikant Tupkar Kumbh Mela fund Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ravikant Tupkar : कुंभमेळ्याचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापर, शेतकऱ्यांना मदत करा; रविकांत तुपकर आक्रमक

Kumbh Mela funds for drought-hit farmers : राज्य सरकारला मानवतेची कोणतीही जाणीव नाही. दुष्काळ तीव्र असताना अनावश्यक घोषणा आणि उधळपट्टी करण्यात सरकार रमले आहे. याबाबत तातडीने फेरविचार करावी, अशी मागणी रवींद्र तुपकर यांनी केली आहे.

Sampat Devgire

Nashik Kumbh Mela News: राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा चार-पाच वर्ष पुढे ढकलावा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असलेला 35 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने राज्यातील दुष्काळ निवारणासाठी वापरावा, शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य शासन उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, दुष्काळ तीव्र होत असताना सरकार नियम आणि अटी यात अडकले आहे. त्याची झळ शेतकऱ्यांना बसत आहे.

राज्य सरकारला घोषणा महत्त्वाच्या की माणूस? असा प्रश्न तुपकर यांनी केला. ते म्हणाले, राज्य शासन सिंहस्थ कुंभमेळावर ३५ हजार कोटींचा खर्च करत आहे. शक्तीपीठ मार्गासाठी सव्वा लाख कोटी खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. राज्य सरकार अनावश्यक कामांसाठी एवढा निधी खर्च करते? हा अनेकांना प्रश्न पडला आहे. या कामांची मागणी कोणीही केलेली नाही. प्रकार मध्ये बसलेल्या ठराविक मंडळींच्या डोक्यातील ही कल्पना आहे. त्यामुळे त्याचा हेतू काय? याविषयी अनेकांना प्रश्न पडतो.

शेतकऱ्यांना मदत करा

राज्यात तीव्र दुष्काळ आहे. 20 तालुके वगळता सबंध राज्य दुष्काळात होरपळते आहे. यावेळी शेतकरी आणि शेतीवर अवलंबून माणूस आणि जनावरे यांना दिलासा देण्याची गरज आहे. तोच खरा माणुसकीचा धर्म म्हणता येईल. मात्र सरकार ते विसरले आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा चार-पाच वर्ष पुढे ढकलावा. शेतकऱ्यांना मदत करावी, असे देखील ते म्हणाले.

आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना नियम आणि अटी लागू नये. त्यामुळे आमची मागणी विचारात न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT