Ajit Navle on Drought : GR आला, पण मदतीचा आकडा गायब! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार? अजित नवलेंचा सरकारला थेट सवाल

Ajit Navale Questions Maharashtra Govt : शेतकरी मदतीचा GR जारी झाला, मात्र मदतीची रक्कम स्पष्ट नसल्याचा सवाल अजित नवले यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष किती मदत पडणार, याकडे लक्ष लागले आहे.
Ajit Navle on Maharashtra Drought
Ajit Navle on Maharashtra DroughtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Navle on Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आर्थिक मदत मिळणार, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता ही प्रक्रिया पुढे नेली असली, तरी मदतीची ठोस रक्कम स्पष्ट न झाल्याने शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारला सवाल केला आहे. दुष्काळ जाहीर करून केवळ कागदोपत्री दिलासा न देता शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय गरजेचा असल्याचे अजित नवले यांनी म्हटले. मात्र, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारकडून NDRF किंवा SDRFच्या निकषांनुसार मदतीचे संकेत दिले जात असले, तरी या मदतीची रक्कम प्रत्यक्ष शेतीच्या नुकसानीच्या तुलनेत कमी असल्याचे नवले यांनी म्हटले आहे.

Ajit Navle on Maharashtra Drought
Trigger 1 Drought Calculation : दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरलेले 'ट्रिगर 1' म्हणजे काय? तुमचा फायदा होणार की नुकसान? 5 मिनिटांत समजून घ्या संपूर्ण गणित!

महाराष्ट्राच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी जिरायत पिकांना 8,500 प्रति हेक्टर, तर बागायती पिकांना 17,000 प्रति हेक्टर मदत देण्याची तरतूद आहे. ही मदत कमाल 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लागू आहे.

याच मुद्द्यावर अजित नवले यांनी सरकारसमोर वेगळी भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन मदत निश्चित करावी, अशी त्यांची मागणी आहे. सोयाबीन आणि कापूस यांसारख्या प्रमुख पिकांवर मोठा खर्च होतो. त्यामुळे केवळ NDRFच्या निर्धारित मदतीवर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

कर्जमाफीचीही मागणी

यासोबतच नवले यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भर दिला. मागील वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बाधित झाले होते, मात्र त्यातील काही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते. आता सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळामुळे शेतीचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफी योजनेचा विस्तार करावा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक दिलासा द्यावा.

Ajit Navle on Maharashtra Drought
Drought Declared : बळीराजासाठी मोठी बातमी! दुष्काळ जाहीर होताच शेतकऱ्यांना मिळणार 'या' 12 सवलती; वाचा सविस्तर!

शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे केवळ कागदावर दुष्काळ जाहीर न करता सरकारने प्रत्यक्ष कृती करून शेतकऱ्यांना भरीव मदत व कर्जमाफी देऊन खऱ्या अर्थाने आधार दिला पाहिजे, असे स्पष्ट मत अजित नवले यांनी मांडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com